देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार..

Spread the love

नागपूर : :देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूरच्या राजभवनात पार पडला. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या १६ डिसेंबरपासून सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी सोहळा घेण्यात आला. १९९१ नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी झाला असून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नवीन ३९ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

मंत्रिमंडळात कोणकोणत्या नेत्यांना स्थान

१. चंद्रशेखर बावनकुळे

२. राधाकृष्ण विखे-पाटील

३. हसन मुश्रीफ

४. चंद्रकांत पाटील

५. गिरीश महाजन

६. गुलाबराव पाटील

७. गणेश नाईक

८. दादा भुसे

९. संजय राठोड

१०. धनंजय मुंडे

११. मंगलप्रभात लोढा

१२. उदय सामंत

१३. जयकुमार रावल

१४. पंकजा मुंडे

१५. अतुल सावे

१६. अशोक उईके

१७. शंभूराज देसाई

१८. आशिष शेलार

१९. दत्तात्रय भरणे

२०. आदिती तटकरे

२१. शिवेंद्रसिंहराजे भोसले

२२. माणिकराव कोकाटे

२३. जयकुमार गोरे

२४. नरहरी झिरवळ

२५. संजय सावकारे

२६. संजय शिरसाट

२७. प्रताप सरनाईक

२८. भरत गोगावले

२९. मकरंद पाटील

३०. नितेश राणे

३१. आकाश फुंडकर

३२. बाबासाहेब पाटील

३३. प्रकाश आबिटकर

३४. माधुरी मिसाळ

३५. आशिष जैस्वाल

३६. पंकज भोयर

३७. मेघना बोर्डिकर

३८. इंद्रनील नाईक

३९. योगेश कदम

दरम्यान, महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर दिल्याचं दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून काही चेहरे मंत्रिमंडळात घेण्यात आले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page