
आदिवासी जीवनशैलीचा विद्यार्थ्यांनी घेतला जवळून अनुभव…
*मिरजोळी (ता. चिपळूण) :* मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित दलवाई हायस्कूल, मिरजोळी या विद्यालयाने जनजाती गौरव पंधरवडा निमित्ताने गुरुवार, १३ नोव्हेंबर २०२५ रोजी कालुस्ते कातकरी वस्ती येथे विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेट आयोजित केली.
या उपक्रमाचा उद्देश आदिवासी बांधवांचे जीवनमान, संस्कृती, परंपरा, भाषा, रीतीरिवाज, उदरनिर्वाहाची साधने तसेच त्यांची शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थिती जाणून घेणे, तसेच त्यांना शिक्षण, स्वच्छता आणि आरोग्याबाबत जागरूक करणे हा होता.
या क्षेत्रभेटीत विद्यालयातील इयत्ता आठवीचे ५० विद्यार्थी, मुख्याध्यापक श्री. रोहित जाधव, ज्येष्ठ शिक्षक श्री. मोहन पवार, भूगोल विभाग प्रमुख सौ. संध्या बोराटे, तसेच कालुस्ते गावाच्या सरपंच सौ. जिया कदम आणि अंगणवाडी सेविका सौ. प्रतीक्षा कदम उपस्थित होत्या.
वस्तीतील प्रमुख ग्रामस्थ श्री. उमेश जगताप व श्री. मंगेश जगताप यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांनी तीर, कामठा, भाला ही पारंपरिक शस्त्रे दाखवली, मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असल्याची माहिती दिली तसेच त्यांच्या सण-उत्सव आणि नृत्य परंपरेविषयी सांगितले. “आम्ही आदिवासी — जंगलाचे राजे!” असे अभिमानाने सांगत त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
या प्रसंगी मुख्याध्यापक श्री. रोहित जाधव यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचे आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, तर श्री. मोहन पवार यांनी बदलत्या जगाबरोबर स्वतःला बदलण्याचे आवाहन केले.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर