चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला पार पडला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा विकेट्सने पराभव केला. भारताचे सुरुवातीचे फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी च सुरूवात करून दिली. पहिल्या ओव्हर्सपासूनच ठेवलेला धावगतीचा वेग भारताच्या फलंदाजांनी कमी होऊ दिला नाही. त्यानंतर रोहित शर्मा 20 धावांवर बाद झाला. विराट कोहलीने शानदार शतक लगावले आहे.
शुभमन गिलने जोरदार सुरुवात केली. शुभमन गिल 46 धावा करून बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने शतकी भागीदारी करून भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. श्रेयस 56 धावा करून बाद झाला. श्रेयस आउट झाल्यावर हार्दिक पंड्या खेळण्यासाठी आला. ताबडतोब फलंदाजी करत त्याने सामना संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला देखील शाहीन अफरीदीने बाद केले.
आजच्या विजयामुळे भारताने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. तर यजमान संघ पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर गेला आहे. भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. भारताने 2442 धावांचे लक्ष्य 43 ओव्हर्समध्येच पूर्ण केले. विराट कोहलीने वनडे फॉर्मटमधील 51 वे शतक साजरे केले. भारताचा हा सलाहग दुसरा विजय ठरला तर पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव ठरला.
कर्णधार रोहित शर्माने , शुभमन गिल, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि पूर्ण संघानेच चांगली कामगिरी केली. भारताने या विजयासह 2017 मधील पराभवाचा वचपा काढला आहे.
*भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तान ढेपाळला…*
दरम्यान सर्वात प्रथम पाकिस्तानने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने भारताला 242 धावांचे लक्ष्य दिले होते. पाकिस्तानची सुरुवात म्हणावी तशी चांगली झाली नाही, मात्र नंतर मोहम्मद रिझवान आणि साउद शकिल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 100 धावांची भागीदारी रचली. शतकी भागीदारी केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ही जोडी फोडली. त्यानंतर मात्र पाकिस्तानच्या कोणत्या फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानचा संघ 49.2 ओव्हर्समध्ये ऑल आउट झाला. पाकिस्तानच्या फलंदाजांनी खूप संथ गतीने फलंदाजी केली.
हार्दिक पंड्याने बाबर आझमची विकेट काढून भारताला सुरुवात करून दिली. लागोपाठ 2 विकेट गेल्या, मात्र त्यानंतर साउद शकिल आणि मोहम्मद रिझवान यांनी शतकी भागीदारी करून डाव सावारण्याचा प्रयत्न केला. मात्र धावगती वाढवण्यात त्यांना अपयश आले. कुलदीप यादवने आपल्या 10 ओव्हर्सनध्ये 3 विकेट घेतल्या.
*पाकिस्तानविरुद्ध या भारतीय फलंदाजांच्या नावावर सर्वाधिक धावा..*
पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा (२५२६) सचिन तेंडुलकरने केल्या आहेत, जो आता निवृत्त झाला आहे. सध्याच्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये, कर्णधार रोहित शर्माच्या नावावर शेजारच्या देशाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. रोहितने पाकिस्तानविरुद्ध १९ सामन्यांमध्ये ५१.३५ च्या प्रभावी सरासरीने ८७३ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि आठ अर्धशतकांचा समावेश आहे.
विराट कोहलीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने पाकिस्तानविरुद्ध १६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५२.१५ च्या प्रभावी सरासरीने ६७८ धावा केल्या आहेत. या काळात त्याने तीन शतके आणि दोन अर्धशतके ठोकली, ज्यामध्ये त्याचा सर्वोच्च धावसंख्या १८३ धावा होती. पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले तर, संघाचा माजी कर्णधार बाबर आझमने आठ सामन्यांमध्ये फक्त २१८ धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून फक्त एक अर्धशतक आले, जिथे ५० धावा हा त्याचा सर्वोच्च धावसंख्या होती.

भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तान ढेपाळला…
दरम्यान सर्वात प्रथम पाकिस्तानने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने भारताला 242 धावांचे लक्ष्य दिले होते. पाकिस्तानची सुरुवात म्हणावी तशी चांगली झाली नाही, मात्र नंतर मोहम्मद रिझवान आणि साउद शकिल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 100 धावांची भागीदारी रचली. शतकी भागीदारी केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ही जोडी फोडली. त्यानंतर मात्र पाकिस्तानच्या कोणत्या फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानचा संघ 49.2 ओव्हर्समध्ये ऑल आउट झाला. पाकिस्तानच्या फलंदाजांनी खूप संथ गतीने फलंदाजी केली.
हार्दिक पंड्याने बाबर आझमची विकेट काढून भारताला सुरुवात करून दिली. लागोपाठ 2 विकेट गेल्या, मात्र त्यानंतर साउद शकिल आणि मोहम्मद रिझवान यांनी शतकी भागीदारी करून डाव सावारण्याचा प्रयत्न केला. मात्र धावगती वाढवण्यात त्यांना अपयश आले. कुलदीप यादवने आपल्या 10 ओव्हर्सनध्ये 3 विकेट घेतल्या.
पाकिस्तान विरुद्ध या भारतीय फलंदाजांच्या नावावर सर्वाधिक धावा..