कर्जत : प्रतिनिधी मुस्लिम बांधव नमाज अदा करत असलेल्या कर्जत तालुक्यातील राशीन 2023 येथील ईदगाह मैदानावर गटारीचे पाणी
येत आहे. या प्रश्नावर मुस्लिम समाजाच्या वतीने कर्जतचा सार्वजनिक बांधकाम उपविभाग कर्जत व राशीन
ग्रामपंचायत यांना वारंवार तोंडी व लेखी स्वरुपात निवेदने दिली. मात्र त्याची दखल न घेतल्याने मुस्लिम समाजाच्या वतीने कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे, अमरापुर-भिगवण रोडवरील गटारीचे पाणी ईदगाह मैदानावर येत असल्यामुळे मैदानावर घाणीचे साम्राज पसरलेले आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांच्या
आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.मुस्लिम समाजाची अस्मिता असलेल्या ईदगाह मैदानावरच गटारीचे पाणी
सोडले जात असल्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून
उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे त्याच्यानिषेधार्थ सोमवारपासून सदर उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव येथे उपोषणाला बसले आहेत.