प्रसिद्ध गायक सोनू निगम याला चेंबूरमधील एका कार्यक्रमात ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलांकडून धक्काबुक्की
मुंबई : प्रतिनिधी (प्रणिल पडवळ)
प्रसिद्ध गायक सोनू निगम याला चेंबूरमधील एका कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याचं समोर आले आहे.दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या मुलानी सुप्रसिद्ध गायक सोनू निगम याच्यासोबत धक्काबुक्की केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
सोमवारी सायंकाळी ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या माध्यमातून चेंबूर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. सोनू निगमचा चेंबूर फेस्टिवलमध्ये लाईव्ह कार्यक्रम होता, कार्यक्रमानंतर सोनू निगम स्टेजवरून खाली उतरताना सोनू सोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांनी धावपळ केली. त्याचवेळी आमदाराचा मुलगा स्वप्निल फातर्फेकर याने सोनू निगम सोबत धक्काबुक्की केल्याची माहिती समोर येतेय. धक्काबुक्की मध्ये सोनू निगम स्टेजच्या पायरीवरून खाली पडला, त्याला वाचवायला गेलेल्या सोनू निगमच्या अंगरक्षकांमधील दोन जण सुद्धा खाली पडल्याची माहिती समोर येतेय. या प्रकारात सोनू निगम सुदैवाने वाचले असून त्यांच्यासोबत टीममध्ये असलेला एक व्यक्ती जखमी झाला आहे. दरम्यान सोनूला काल रात्री जवळच्या जैन रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला आहे. सोनू निगम सध्या सुखरूप आहे
मध्यरात्री सोनू निगमकडून चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सोनू निगमने चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. सोनू निगमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीसी कलम 341, 323, 337 च्या अंतर्गत आमदार प्रकाश फातेरपेकर यांचा मुलगा स्वप्निल फातर्फेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे
जाहिरात :