नेरळ-सुमित क्षिरसागर
आर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्यात नाव असलेले रायगड जिल्ह्यातील आरोग्य विभागात सेवा पुरवणारे नेरळ शहरातील प्रसिद्ध डॉक्टर सागर गजानन काटे यांना नेरळ पोलिसांनी आज सकाळी अटक केली आहे.शासनाच्या रेल्वे विभागात काम लावतो तसेच आरोग्य विभागाच्या शासकीय सेवेत नोकरी मिळवून देतो म्हणून डॉ सागर काटे यांसह अन्य सात आरोपींनी फसवणूक केली होती.ही फसवणूक दोन कोटीच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले होते.यामध्ये दोन आरोपींना नेरळ पोलिसांनी सुरुवातीला अटक केली होती त्यात मुख्य आरोपींमध्ये फरार असलेले डॉ सागर काटे यांना गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तब्बल सहा महिन्याच्या आत नेरळ पोलिसांनीअटक करण्यात यश आले आहे.
नेरळ पोलीस ठाण्यात निलेश दत्तात्रय भिसे या व्यक्तीने नेरळ येथील डॉक्टर सागर काटे यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली,साडेपाच लाख रुपयांची ही फसवणूक झाल्याची तक्रार आहे,सरकारी नोकरीत लावतो म्हणून डॉक्टर काटे यांनी आपल्याकडून ऑनलाइन पैसे घेतल्याचे सांगण्यात आलं.दरम्यान सागर काटे यांच्या बाबत ही एक तक्रार नसून तीन तक्रार दाखल झाल्याचे नेरळ पोलिसां कडून सांगण्यात आलं होते.आणि चौकशीत हा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती.फसवणूक झालेले तक्रारदार हे डॉक्टर सागर काटे यांचे निकट वर्तीय आणि नातलग असल्याचे निष्पन्न झालं होते.एकटे डॉक्टर सागर काटे यांनी ही फसवणूक केली नसून यामध्ये सात जण असल्याचे बोलले जात आहेत,ऑनलाइन हे पैसे एकमेकांच्या बँक खात्यात जमा करायचे.डॉक्टर काटे यांनी सरकारी नोकरीत लावतो म्हणून हे पैसे गोळा केले आहेत. काहींना रेल्वेत,तर काहींना सार्वजनिक बांधकाम खाते,आरोग्य खाते असे सांगून फसवणूक केली,एवढंच काय तर काहींना नोकरीवर उभे देखील करून ओळखपत्र देखील देण्यात आल्याचे सांगण्यात आलं होते.तक्रारदार हे कामावर रुजू झाले परंतु त्यांना तिथे वाईट अनुभव आला,यानंतर आपली फसवणूक झाल्याचे समजलं,गेली दोन वर्षे होत आली आहेत मला कामावर रुजू करतो सांगून पैसे देखील दिलेले नाहीत असे तक्रारदार निलेश भिसे यांनी सांगितले होते.याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात 158/2024 भारतीय न्याय संहिता कलम 318(4) 316(2) 336(2) 336(3) 340(2),3(5) अन्वये फसवणूक आर्थिक गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर नेरळ पोलीस ठाण्यात ऐकून तीन फिर्यादी म्हणून समोर आले होते,डॉक्टर काटे यांचे नाव घेतल्याने यामध्ये नवी मुंबई उलवे पनवेल येथे राहणारे नितीन महादू वाघ, आशिष वारे या आरोपी तरुणांना नेरळ पोलिसांनी सुरुवातीला ताब्यात घेतले होते.यामधील मुख्य आरोपी म्हणून फरार असलेले रायगड जिल्ह्यातील आरोग्य विभागातील डॉक्टर सागर काटे यांना नेरळ पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे.काटे यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.याबाबत अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी शिवजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक हे करीत आहेत.
*सदर फसवणुकीत 25 ते 30 जनांहून अधिक जणांची फसवणूक झाल्याचे बोलले जात आहे तर यामध्ये दोन कोटी रुपयांची फसवणूक असून वाढण्याची शक्यता आहे असे ही सांगण्यात आलं.नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असताना डॉक्टर सागर काटे यांनी कोरोनाच्या काळात उत्तम कामगिरी केली होती.त्यामुळे नेरळ शहरात ते प्रसिद्ध डॉक्टर म्हणून नावारूपाला आले होते,तरुण तडफदार आणि त्यांच्याकडे पाहिले जात होते,एक उच्च शिक्षित घराण्यातील असलेले काटे यांचं फसवणुकीत नाव समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे, शिवाय आपल्याच नातेवाईकांना फसवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.*