खेड येथे सापडल्या बनावट नोट..

Spread the love

खेड/ रत्नागिरी /प्रतिनिधी- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड बाजारपेठेत ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
मंगळवारी खेड जवळील भरणे येथील एका पेट्रोल पंपात ५०० च्या ३ बनावट नोटा आढळल्याने खळबळ उडाली . या बनावट नोटा नेमक्या आल्या कुठून, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान यंत्रणांसमोर आहे.

२००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर ५०० रुपयांच्याच नोटा सर्रासपणे चलनात वापरण्यात येत आहेत. ग्राहकांकडून मिळणाऱ्या नोटा बनावट की खोट्या, याची प्रत्येक व्यापाऱ्यांकडून चाचपणी केल्यानंतरच स्वीकारल्या जात आहेत. बँकांमध्येही नोटांची तपासणी करूनच ५०० च्या नोटा स्वीकारण्यात येत आहेत. मात्र काही ठिकाणी नोटांची तपासणी केली जात नसल्याची संधी साधत बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भरणे येथील एका पेटोल पंपावर ५०० रूपयांच्या ३ बनावट नोटा चलनात वापरून फसवणूक केल्याचे उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या नोटा नेमक्या कोणत्या वाहनचालकांकडून प्राप्त झाल्या, याचा शोध घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. या प्रकारानंतर पंपात पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांकडून ५०० रूपयांच्या नोटा स्वीकारताना दोन ते तीनवेळा खातरजमा करूनच स्वीकारल्या जात आहेत.
बरेच दिवस नकली नोटा चर्चेत आल्या नव्हत्या, परंतु आता रत्नागिरी जिल्ह्यात नकली नोटा मिळाल्याने व्यापारी आणि जनता चिंताक्रांत झाली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page