पुणे प्रतिनिधी- फेक नरेटीव्ह जास्त दिवस टीकत नाही त्यांला खऱ्या नरेटीव्हने उत्तर द्या. भाजपच्या योजना लोकांपर्यत पोहचवा. विरोधकांना उत्तर देण्यासाठी आदेशाची वाट पाहू नका, असे म्हणत भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना फ्री हँड दिला आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काही मर्यादित काळासाठी आरक्षण दिले होते. तो काळ संपत असताना युतीचे सरकार होते, तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात आरक्षणाची सीमा वाढवण्याचा निर्णय घेतला, आज जे आरक्षण चालले आहे ते अटलबिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा वाढवल्याने म्हणून या देशात संविधानाने दिलेले आरक्षण सामान्य लोकांना मिळत आहे, असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
शरद पवारांनी आरक्षण का दिले नाही…
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, काही जण महायुती निवडून आली तर आरक्षण संपवणार, संविधान बदलणार असे खोटे नरेटीव्ह पसरवत आहेत. फेक नरेटीव्हला जास्त दिवस टीकत नाही. खोटे जास्त दिस टिकत नाही. यांच्या खोट्या विजयाचा फुगा विधान परिषदेच्या निवडणुकीत यांचा फटला आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. दुफळी निर्माण झाली आहे. अनेक समाज एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. काही नेत्यांना वाटते हे समाज जर एकमेकांसमोर उभे राहिले तरच आपण निवडून येऊ, ते केवळ राजकारण करु पाहत आहे. सरकार येते जाते,पण समाज एकसंध राहिला पाहिजे. समाजातील दुफळी लवकर दूर होणार नाही. गरीब मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही आमची भूमिका आहे. 1982 साली आण्णासाहेबांनी आरक्षणासाठी स्वत:ला गोळी मारुण घेतली. शरद पवार यांनी का आरक्षण दिले नाही. मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही हे कोण म्हटले हे सर्व समाजाला माहिती आहे. आम्ही आरक्षण दिले आणि ते टिकवले सुद्धा. पण मविआचे सरकार आले आणि त्यांनी ते टिकवले नाही. पुन्हा आमचे सरकार आल्यावर आरक्षण दिले.
तुमची भूमिका स्पष्ट करा…
आरक्षण प्रश्नांवरुन शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत तुमची भूमिका काय आहे, दुटप्पी भूमिका घेऊ नका मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्सासाठी तुमचे समर्थन आहे का? असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे. दोन्ही समाजाला अधांतरी ठेवू नका. समाजाला न्याय मिळवून देण्सासाठी आमची शिव्या खाण्याची तयारी आहे. पण तुमचा बुरखा फाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा फडणवीसांनी दिला आहे.
मविआची जनतेला फसवण्याची रणनिती..
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधकांचे सरकार असताना त्यांनी सर्व योजना बंद पाडल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचे अर्ज हे लोक भरुण घेतील आणि सरकारपर्यंत पोहचू देणार नाही. यामुळे माता -भगिणीने महायुतीवर नाराज होऊ नये. महिलांनी या मविआच्या लोकांकडून अर्ज भरुण घेऊ नये असे फडणवीसांनी म्हटले आहे.
आदेशाची वाट पाहू नका…
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी उत्तर देता येते, पण तो विचार करतो की, आदेश आला तर उत्तर देईल. मात्र, आता सर्व पदाधिकाऱ्यांनी आदेशाची वाट न बघता जशाच्या तसे उत्तर द्या. केवळ हीट विकेट होऊ द्यायची नाही, चार दिवस आपल्या बोलण्याचीच उत्तरे द्यावे लागतील असे बोलू नका. खरे बोलायला विचार करावा लागत नाही, तुम्ही खोट्याला खऱ्याने उत्तर द्या, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
थोडी मेहनत घ्या…
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकाने मुलीचे 100 टक्के शिक्षण मोफत केले आहे. तर गृहिणीसाठी 3 सिलेंडर देण्यात येत आहे. 2013 मध्ये या ठिकणी निवडणूक लढवली त्यानंतर 2014 मध्ये आपण बहूमतासह जिंकली. निवडणूक आपण 4 जणांविरोधात लढत होतो, आपण फेक नरेटीव्हला खऱ्या नरेटीव्हने उत्तर देणार आहोत. अवघ्या काही मतांनी आपला पराभव झाला आहे, थोडी जास्त मेहनत घ्यायची गरज आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.