
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीबाबत उत्सुकता कायम आहे, कारण विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपून दीड वर्ष उलटले आहे. या पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर चर्चा सुरू आहे.
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी कोणाची निवड होणार याबद्दल उत्सुकता कायम आहे. विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपून दीड वर्ष उलटलं आहे. त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पण अद्याप तरी भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष मिळालेला नाही. या पदासाठी अनेक दिग्गजांची नावं चर्चेत आहेत. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे. यावर फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
भाजपचं अध्यक्षपद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाजपमधील भूमिका यावर देवेंद्र फडणवीस सविस्तर बोलले. इंडिया टुडे समूहाच्या व्यासपीठावर त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार असून महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची नेमणूक गेल्या दीड वर्षांपासून रखडलेली आहे. त्यावरही फडणवीस सविस्तर बोलले. भाजप अध्यक्ष पदासाठी कोणत्याही प्रकारचा पेच नाही. भाजप अध्यक्ष पदासाठी अनेक नावांची चर्चा माध्यमांमध्ये सुरु आहे. यातील काही नावं ऐकून तर मला आश्चर्याचा धक्काच बसला, असं फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या महत्त्वाकांक्षांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ‘मी भाजपसाठी काम करतो. मुंबईत कोणी असावं, दिल्ली किंवा नागपूरमध्ये कोण असावं हे आमच्या पक्षात कोणी एक व्यक्ती ठरवत नाही. भाजपमध्ये एक व्यक्ती निर्णय घेत नाही, तर पक्ष ठरवत असतो,’ असं फडणवीस यांनी सांगितलं. ‘मला जिथपर्यंत भाजपची कार्यपद्धती माहीत आहे, त्या आधारे मी इतकं नक्कीच सांगू शकतो की मी पुढील ५ वर्षे महाराष्ट्रातच आहे. पाच वर्षांनंतर पक्ष जो निर्णय घेईल, तसं होईल,’ असं फडणवीस यांनी म्हटलं.
भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष कधी मिळणार, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही करु नका, पक्ष या प्रश्नाचं उत्तर लवकरच शोधेल, असं उत्तर फडणवीस यांनी दिलं. ‘सगळ्या गोष्टी योग्य वेळी होतील. सगळ्या समस्या सोडवल्या जातील. सध्याच्या घडीला कोणताही पेच नाही. अध्यक्ष पदाची निवडणूक लवकरच होईल,’ असं फडणवीस म्हणाले. भाजपचा अध्यक्ष होणारा नेता तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचा असेल, असं फडणवीस यांनी ठासून सांगितलं.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…

