
दिपक भोसले/संगमेश्वर- मौजे मुरडव येथे पकडण्यात आलेल्या शिकाऱ्यांकडे संगमेश्वर पोलिसांना चार ठासणीच्या बंदुका आणि दहा जिवंत गावठी बॉम्ब आणि जिवंत काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली आहे.
संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर पोलिसांनी कारवाई करण्याचा धडाका सुरू केल्याने बिधास्तपणे शिकारी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने शुक्रवारी रात्री कुटरे फाटा ते आरवली जाणारी रोडवर मौजे मुरडव येथे विश्वास विष्णू हेमण, रवींद्र आत्माराम गुरव आणि अभिजीत गोविंद मांडवकर या तिघांना शिकारीच्या तयारीत असताना पकडले होते तसेच संगमेश्वर पोलिसांनी सुदेश हनुमंत मोहिते याला असे चौघांना शिकारीच्या तयारीत असताना पकडले होते .
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चौधरी, संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी, चंदू कांबळे, सचिन कामेरकर, किशोर जोयशी, विश्वास बारगले, विनय मनवल, पो ना अनिकेत चव्हाण,रेवणनाथ सोडमिसे, सोमा आव्हाड, प्रमोद रामपुरे, गणेश बिक्कड,सिद्धेश आंब्रे, सचिन जाधव, सोमनाथ खाडे,केशव मुटगर आदींनी तपास करत शिकाऱ्यांकडून सिंगल बॅरल काडतुस, लाल रंगाची बजाज मोटरसायकल जिवंत काडतुसे, गावठी बनावट सिंगल बॅरल ठासण्याची बंदूक गावठी बनावटीचा गावठी कट्टा ,गावठी बनावटीची डबल बॅरल ठासणीची बंदूक आणि दहा काळपट पांढऱ्या रंगाचे लहान मोठे गोळे आकाराचे गावठी जिवंत बॉम्ब
हस्तगत केले आहेत.
संगमेश्वर पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे