मुंबई: मुंबई विद्यापीठातील बीए विभागाच्या तृतिय वर्षाची परीक्षा ही उद्यावर येऊन ठेपली आहे मात्र अद्याप विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट मिळाले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. परीक्षेचे ठिकाण आणि आसन क्रमांक मिळाले नसल्याने परीक्षेला कसे बसणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई विद्यापीठाच्या बीए तृतीय वर्षच्या सेमिस्टर 6 च्या परीक्षा उद्यापासून सुरू होत आहेत. मात्र विद्यार्थ्यांना अद्याप हॉलतिकीट मिळालेले नाही! त्यांना त्यांचे सेमिस्टर 5 निकालही मिळालेले
मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याला बगल दिली असताना, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आपल्या वक्तव्याने आणि महाराष्ट्रविरोधी सरकारचा एक भाग बनून महाराष्ट्राचे भविष्य उद्ध्वस्त करण्यात व्यस्त आहेत असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.