देवरुखचे माजी उपनगराध्यक्ष श्री. सुशांत मुळ्ये यांची संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी निवड.

Spread the love

दिव्यांग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून कुंभारखणीचे श्री. अमित अनंत देसाई यांची समितीच्या सदस्यपदी नियुक्ती..

देवरुख तसेच संगमेश्वर तालुक्यातील सर्वपक्षीय नेते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव.

जनशक्तीचा दबाव न्यूज | देवरुख | ऑक्टोबर १३, २०२३.

नगर पंचायत देवरुखचे मा. उपनगराध्यक्ष तसेच भाजपाचे नवनियुक्त देवरुख शहराध्यक्ष श्री. सुशांत मुळ्ये यांची वर्णी संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी लागली आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी म्हणून कुंभारखणीचे श्री. अमित अनंत देसाई यांचीही या समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे देवरुख तसेच संगमेश्वर तालुक्यातील सर्वपक्षीय नेते तसेच सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, आध्यात्मिक, सहकार अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या मान्यवर मंडळींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कृषी क्षेत्रात पदवीधर असणारे श्री. सुशांत मुळ्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून राष्ट्रीय विचारांचे संस्कार झाल्याने भारतीय जनता पार्टीशी जोडले गेले. सर्वसामान्य कार्यकर्ता ते देवरुखचे उपनगराध्यक्ष हा प्रवास अत्यंत अल्प कालावधीत पूर्ण केल्यानंतर भाजपा देवरुख शहराध्यक्ष म्हणून सलग दुसऱ्यांदा त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभ्यासू नेतृत्व, शैलीदार वक्तृत्त्व आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता ही त्यांची बलस्थाने असल्याने पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या त्यांना मिळत गेल्या. त्यांनीही मिळालेल्या संधीचे सोने करत सर्व जबाबदाऱ्यांना न्याय दिला.

संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांना आता संगमेश्वर तालुक्यातील नोंदणीकृत संस्थेचा अशासकीय प्रतिनिधी म्हणून म्हणून आलेल्या अर्जांची छाननी करून नागरिकांना लाभ मिळवून देण्याचे दायित्व प्राप्त झाले आहे. याचा लाभ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला, खासकरून निराधार महिलांना होणार असल्याने एका योग्य व्यक्तीची निवड समितीच्या सदस्यपदी झाल्याबद्दल सर्वसामान्य जनतेतही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“सर्व ज्येष्ठ मंडळींच्या पाठींब्यामुळे तसेच मार्गदर्शनाने माझी सदस्यपदी नियुक्ती झाली आहे त्यामुळे मी त्यांचा शतशः ऋणी आहे. मा. जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत साहेब, भाजपा चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव साहेब तसेच आमचे मित्र व संगमेश्वर (दक्षिण) तालुकाध्यक्ष श्री. रूपेश कदम यांच्या नेतृत्त्वात या सदस्यपदाच्या माध्यमातून जनसेवा करण्यासाठी मी उत्सूक आहे. माझी निवड सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन.” असे आश्वासन श्री. सुशांत मुळ्ये यांनी दिले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page