सावित्रीबाईंवर प्रेम करणारा प्रत्येक माणुस चुकीच्या गोष्टीचा विरोध करणारच- आ.मनिषा चौधरी

Spread the love

मुंबई – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल गलिच्छ आणि आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या इंडिक टेल्स या वेबसाईट विरोधात कारवाई करून अशा प्रवृत्तींना आळा घालण्याची मागणी करण्या करिता भाजपा आ.मनीषा चौधरी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने मुंबईचे पोलीस आयुक्त यांना भेटून निवेदन दिले.

जाणून बुजून वातावरण निर्मिती केली जात आहे.याची गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करून कारवाई करा. आरोपी कोण आहेत,त्यांचा शोध घ्यावा. वेबसाईट कोणी तयार केली याचा कर्ता कोण आहे? लवकरच योग्य कारवाई करण्याचे आश्वासन मिळाले.ट सरकार न्याय देणारा सरकार आहे. कुठे तरी मुद्दामून कोण करत आहे का? यासर्वांचा कसून तपास करावा असे निवेदन यावेळी शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांना दिले.

सावित्रीबाई होत्या म्हणून आम्ही आमदार आणि सुशिक्षित महिला आहोत.छगन भुजबळ ओबीसी नेते आहेत. सावित्रीबाईबद्दल आदर आणि प्रेम आहे त्याने विरोध करावा. त्यांनी नक्की काय म्हटले होते, हे एकदा पुन्हा ऐकून घ्यावे.आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत.त्यांचा अपमान आम्ही सहन नाही करणा,असे मत आ.मनिषा चौधरी यांनी व्यक्त केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page