
*पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्यापूर्वी आता पक्षांतराला वेग आला असून, शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.*
*मुंबई/ प्रतिनिधी-* पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्यापूर्वीच आता राज्यात पक्षांतराला वेग आल्याचं पहायला मिळत आहे. विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्याचं पहायला मिळालं, मात्र आता महायुतीमधल्या घटक पक्षातीलच नेते एकमेकांच्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या काही नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यानं शिवसेना शिंदे गटाचे नेते खासदार नरेश मस्के यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत असून, आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसं रायगड जिल्ह्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. जिल्ह्यातील शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादीतील वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. मंत्री भरत गोगावले यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय सुरुंग लावण्यास सुरुवात केल्यानंतर, आता सुनील तटकरेंनी देखील शिवसेनेतील मोठे मासे गळाला लावायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व गोगावले यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे रमेश मोरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये सुतारवाडी येथे हा जाहीर पक्षप्रवेश पार पडला, यावेळी सुनील तटकरे यांनी रमेश मोरे व त्यांच्या सहकार्यांचे आपल्या पक्षात स्वागत केले. यावेळी बोलताना रमेश मोरे यांनी शिवसेनेवर आरोप केले आहेत.
*स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्ष प्रवेश …*
दरम्यान पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी हा पक्षप्रवेश झाला आहे. हा रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का मानण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवायच्या की स्वबळावर याचं अद्याप कोणतंही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र दुसरीकडे पक्षांतराला वेग आल्याचं पहायला मिळत आहे. महायुतीमधीलच अनेक जण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असल्याचं पहायला मिळत आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*





