संगमेश्वर/दिनेश अंब्रे – नावडी संगमेश्वर मधील रामपेठ अंगणवाडी मध्ये झाडे लावा झाडे जगवा राष्ट्रीय कार्यक्रम साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमास नावडी सरपंच प्रज्ञा कोळवणकर, उपसरपंच विवेक शेरे, ग्रामपंचायत सदस्य प्रतीक्षा शेरे ,बचत गट बँक सखी सानिका कदम, विशेष कार्यकारी अधिकारी अंजली कोळवणकर ,ज्येष्ठ नागरिक प्रतीक्षा चिचकर ,पालक आर्या रहाटे ,मापारी बाई,पालक ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
प्रथम मुलांना झाडाचे महत्व सामाजिक कार्यरकर्ते दिनेश अंब्रे यांनी सागतांना सावली ,फळे,बिया,भाज्या लाकूड औषधे,डिंक,यासाठी झाडांचा उपयोग मानवाला पावलोपावली कसा होतो,तसेच पाऊसमान टिकण्यासाठी येणारे पावसाचे ढग अडविण्यासाठी झाडांची जंगले महत्त्वाची ठरतात.म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड दरवर्षी लावावे असा उल्लेख करून स्पष्ट केले. त्यानंतर अंगणवाडी परिसरात मान्यवरांच्या शुभहस्ते झाडे लावण्याचा कार्यक्रम करण्यात आला.
सरपंच प्रज्ञा कोळवणकर या़ंनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून प्रत्येकाने झाडे लावा,झाडे जगवा,हे घोष वाक्य मनोमनी लक्षात ठेऊन कर्तव्य समजून उपलब्ध जागेत एक तरी झाड लावा,असे आवाहन केले.
उपस्थितांचे स्वागत अंगणवाडी सेविका पल्लवी शेरे, यांनी केले व आभार प्रदर्शन मदतनीस शितल अंब्रे यांनी केले,