
चिपळूण (ओंकार रेळेकर)- औद्योगिक परिसरातील सातत्याने खंडित होत असलेल्या वीजपुरवठा मुळे त्रस्त झालेल्या उद्योजकांनी आज लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनच्या माध्यमातून महावितरणचे लोटे येथील कार्यालयावर धडक देत अधिकऱ्यांना जाब विचारला…..
येत्या चार दिवसात या संदर्भात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठा बाबत ठोस पावलं जर उचलली गेली नाहीत… तर महावितरण विरोधात मोठे आंदोलन करण्यात येईल… प्रसंगी महावितरण चे लोटेतील सबस्टेशन ला टाळे ठोकण्याचा इशारा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष राज आंब्रे यांनी दिला..
यावेळी उद्योजक संघटनेचे सचिव कुंदन मोरे, सहसचिव सूर्यकांत वडके, खजिनदार मिलिंद बारटक्के, जिल्हा फेडरेशन चे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, संचालक शिरीष चौधरी, विश्वास जोशी, रवींद्र कदम, मंदार अडीवरेकर, राजकुमार जैन, राजेश तिवारी, उद्योजक मिलिंद बापट, राजेंद्र पवार, उद्योगांचे प्रतिनिधी दांडेकर, महेश, पाटील, पेडणेकर इ. मोठया संख्येने उपस्थित होते.