
चिपळूण – जागतिक महिला दिनानिमित्त खेर्डी गावातील महिलांसाठी खेर्डी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित रक्तगट तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, डोळे तपासणी शिबिराचा शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते तथा वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, सरपंच अश्विनी पंडित, उपसरपंच सुप्रिया उतेकर, माजी सरपंच जयश्री खताते, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य विनोद भुरण, सदस्य अभिजित खताते, प्रकाश पाथरवट यांच्यासह ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य, लोकप्रतिनिधी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी प्रशांत यादव आणि स्वप्ना यादव यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला.