🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज
🛑 कोचीन | जानेवारी ३१, २०२३.
◼️ रविवारी शारजाहून येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानातील ‘हायड्रॉलिक’ने काम करणे बंद केल्याने या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
◼️ कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, रविवारी रात्री ८.४५ वाजता विमानतळावर संपूर्ण इमर्जन्सी घोषित करण्यात आली. यानंतर रात्री ८.२६ वाजता ते विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. मात्र असे असले तरी विमानतळावरील एकही धावपट्टी बंद केली गेली नाही आणि कोणतेही विमान वळवले गेले नाही. यानंतर हा आपत्कालीन आदेश रात्री ८.३६ वाजता मागे घेण्यात आला. दरम्यान विमानातील सर्व १९३ प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली.