इंधनाच्या कमतरतेमुळे ‘मेडे कॉल’नंतर इंडिगोच्या विमानाचे बेंगळुरूमध्ये आपत्कालीन लँडिंग…

Spread the love

*बेंगलोर-* अहमदाबाद विमान अपघातानंतर (Ahmedabad Plane Crash) विमान कंपन्या त्यांच्या प्रवाशांच्या सुरक्षेची अधिक काळजी घेत आहेत. गुवाहाटीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे (IndiGo Flight) गुरुवारी रात्री विमानात इंधन कमी असल्याने एटीसीला ‘मेडे कॉल’ (Mayday Call) केल्यानंतर बेंगळुरू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. या विमानात 168 प्रवासी होते. प्राप्त माहितीनुसार, गुवाहाटीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान 6E 6764 ला गुरुवारी संध्याकाळी बेंगळुरूला आणीबाणीचा पर्याय म्हणून वळवावे लागले. इंधन पातळी अत्यंत कमी असल्याने पायलटने ‘इंधन मेडे’ असा दुर्मिळ कॉल दिला होता. गुवाहाटीहून सायंकाळी 4:40 वाजता निघालेले एअरबस A321 विमान मोठ्या प्रमाणात हवाई वाहतूक कोंडीमुळे चेन्नईत उतरू शकले नाही. त्यामुळे या विमानाचे बेंगळुरूमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

पाटलटने गुरुवारी रात्री 8:15 वाजता विमान बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. वृत्तानुसार, विमान बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (KIA) पासून सुमारे 35 नॉटिकल मैल अंतरावर होते तेव्हा पायलटने धोकादायकपणे कमी इंधन पातळीचे कारण देत एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला मेडे कॉल केला. मेडे कॉल हा विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वोच्च पातळीचा आपत्कालीन इशारा आहे. हा कॉल फक्त जीवघेण्या परिस्थितीतच जारी केला जातो.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page