कर्जत : प्रतिनिधी ( सुमित क्षीरसागर) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर चालविण्यात आलेल्या पायलट प्रकल्प संपवल्यावर ई रिक्षा बंद झाल्या असल्यामुळे सदर बंद पर्यावरण पूरक ई रिक्षा पुन्हा सुरू व्हाव्यात. तसेच सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या स्टेनुसार माथेरान मधील बंद पडलेल्या रस्त्यांची कामे ही पुन्हा सुरु करावी. या मागणीसाठी दि. १७ मार्च रोजी माथेरान पर्यावरण संवेदनशील मंच यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. सदर मार्चाची सुरवात हि माथेरान मधील श्रीराम चौकातून करण्यात आली. मोर्चाच्या अग्रस्थानी शालेय विद्यार्थी हातात बॅनर झळकवत घोषणा देत पुढे त्यांच्या मागे हातरीक्षा मध्ये बसलेले जेष्ठ नागरिक व दिव्यांग त्या मागे महिला,नागरिक तसेच माथेरान मधील भारतीय जनता पक्ष,राष्ट्रीय काँग्रेस,आरपीआय महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासह श्रमिक रिक्षा संघटना,जेष्ठ नागरिक संघ,मानव कल्याण दिव्यांग सामाजिक संघटना,माथेरान व्यापारी फेडरेशन,निसर्ग पर्यटन पॉईंट संघटना,क्षत्रिय मराठा समाज,कोकावासीय समाज,माथेरान बौद्ध महासभा,माथेरान चर्मकार समाज,माथेरान मुस्लिम समाज,माथेरान वाल्मिक समाज,माथेरान बोहरा समाज,माथेरान गुजराती समाज, यांच्यसह बालगोपाल भजन मंडळ,वन ट्री हिल मंडळ,रग्बी मंडळ,या संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते व माथेरान पर्यावरण संवेदनशील मंच कडून शकील पटेल,सुनील शिंदे,राजेश चौधरी,प्रवीण सकपाळ,योगेश जाधव,प्रदीप घावरे,प्रकाश सुतार तसेच माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर,माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावन्त,माजी उप नगराध्यक्ष आकाश चौधरी,तसेच संतोष कदम,वर्षा शिंदे,दत्तात्रय संगारे,श्रीराम मढवे,नासिर शारवन,अनिल गायकवाड,संदीप कदम हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चा हा दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अधीक्षक कार्यालयावर धडकला यावेळी माथेरान अधीक्षक दीक्षांत देशपांडे यांना निवेदन देत टिस या संस्थेने केलेला अहवाल हा लवकरात लवकर राज्य शासनामार्फत सर्वोच्च न्यायालयात दाखल करावा. व यावर उपाय म्हणून क्ले पेव्हर ब्लॉकचा पर्याय सनियंत्रण समितीच्या मान्यतेने बसविण्यात आले असल्यामुळे ई रिक्षा व क्ले पेव्हर ब्लॉक रस्त्याचे काम हे त्वरित सुरू करावे अशी मागणी मोर्चेकरांकडून करण्यात आली. तर सदर मोर्चा बाबत रायगड जिल्हाधिकारी व वरिष्ठ कार्यालयात न लयांना तात्काळ कालविणार असल्याचे माथेरान अधीक्षक दीक्षांत देशपांडे यांच्या कडून सर्व मोर्चेकऱ्यान समोर स्पष्ठ करण्यात आले आहे.