
रत्नागिरी ; रत्नागिरी एसटी प्रशासनाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभाराविरोधात मनसे रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री.रूपेश जाधव यांच्या नेतृत्वात मनसेने एस टी प्रशासनाला आज जाब विचारला. एसटीच्या गळक्या व नादुरुस्त गाड्यांतून प्रवासी वाहतूक , आगार व्यवस्थापकांचे प्रवाशांसोबतचे उद्दाम वर्तन , एस टी बसेसच्या अनियमित वेळा , पूर्वसूचना न देता एसटी फेरी रद्द करणे या सर्व गलथान कारभाराविरुद्ध मनसेने आज प्रशासनाला जाब विचारून येत्या १५ दिवसांत सुधारणा करण्यात याव्या अन्यथा मनसेच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला देण्यात आला .
काय म्हणाले मनसे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव विडिओ पहा सविस्तर…
यावेळी विभाग नियंत्रक श्री. प्रद्नेश बोरसे यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी मनसे रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री.रूपेश जाधव, तालुका उपाध्यक्ष श्री. राजू पाचकुडे, श्री.रूपेश चव्हाण, श्री. विशाल चव्हाण, श्री. अभिलाष पिलणकर, रस्ते आस्थापना उपजिल्हासंघटक श्री. अशोक नाचणकर, महिला शहराध्यक्ष सौ.अंजलीताई सावंत, शहर सचिव सौ. सारीकाताई शर्मा, सौ. सर्वेशा चव्हाण, अखिल शाहू, सोम पिलणकर, राहुल खेडेकर, रूपेश पाचकुडे, नवनाथ साळवी, संदीप सुर्वे, संतोष चव्हाण, अभि कट्टीमणी,आदेश धुमक, यश पोमेंडकर, आकाश फुटक आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
