शिवाजी पार्क, मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वरून जोरदार भाषणातून यावेळी टीका केली. फेसबुक लाईव्ह करून देत चालवता येत नाही त्याच्यासाठी फिल्डमध्ये उतरून काम करावे लागते. तसेच उद्धव ठाकरे संपत्तीचे वारसदार विचारांचे वारसदार तर सर्वसामान्य शिवसैनिक आहेत. यावेळी आपल्या भाषणातून शिंदे नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांचा पाडाच वाचून दाखवला.
उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होण्याचा विचार करत आहेत. ते फेसबुक लाईव्ह करुन देश चालवणार आहेत का? असा खोचक प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे. कोरोना संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी देश सांभाळत असताना उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह करत बसले होते, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; म्हणाले संपत्तीचे वारसदार..
तुम्ही तर आम्ही विचारांचे वारसदार
उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचे वारसदार आहेत. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आम्ही असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आमच्याकडे शिवसेना आहे तर तुमच्याकडे शिव्यासेना असल्याची टीका देखील शिंदे यांनी केली आहे. जीव गेला तरी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर हल्ला चढवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मुंबईत एकही हल्ला झाला नाही. कारण मुंबईत काही जरी झाले तरी मोदी पाकिस्तानात घुसून मारेल, हे पाकिस्तानला माहिती आहे. आज बाळासाहेब असते तर मोदी गेले तर देश गेला असे म्हणाले असते. आज देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरज असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. आज जगभरात देशाचे नाव झाले आहे. आज जगभरातील नेते मोदींची स्वाक्षरी घेतात, त्यांच्यासोबत फोटो काढतात, त्यांचा आदर करतात, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.