खेड : उद्धव ठाकरे यांनी ५ मार्च रोजी खेडमधील गोळीबार मैदानात जाहीर सभा झाली होती.सभेतून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सर्व आमदारांवर निशाणा साधला होता. मात्र आता त्याच मैदानावर एकनाथ शिंदे यांची १९ मार्च रोजी सभा होणार आहे. या सभेची तयारी देखील शिंदे गटाकडून जोरदार सुरु आहे.
एकनाथ शिंदेंच्या सभेआधी खेडचे स्थानिक आमदार आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी या सभेची माहिती देत टिझर पोस्ट केला आहे. तसेच या व्हिडिओद्वारे शिवसेना निष्ठावंतांचा एल्गार…, असंही योगेश कदम यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंसह शिंदे गटातील नेते उद्धव ठाकरेंना काय प्रत्युत्तर देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.उद्धव ठाकरेंनी ज्या गोळीबार मैदानात भा घेतली त्याच गोळीबार गोळीबार मैदानात होणार आहे. सभेला उत्तर देण्यासाठी गोळीबार मैदानातच रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. शिंदे यांच्या जाहीर सभेसाठी गोळीबार मैदानात स्टेज उभारणीला सुरुवात झाली आहे. गोळीबार मैदान हाउसफुल करण्यासाठी शिवसैनिकांची नियोजनाची कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात येत आहे.