राज्यात सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे तिन्ही प्रमुख नेते आज राजभवनावर दाखल झाले आहे.
मुंबई /प्रतिनिधी- मुंबईत आज भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एक मुखाने निवड करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव महायुतीकडून ठरल्यानंतर कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद दिसतोय. दरम्यान, उद्या मुंबईतील आझाद मैदानवर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहे. असे असताना त्यापूर्वी महायुतीतील अनेक प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहे.या भेटीत महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा, उद्या शपथविधी सोहळा …
सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे तिन्ही प्रमुख नेते एकाच गाडीतून राज भवनावर पोहचले आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तीन नेते राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत राज्यात सत्तास्थापनेचा दावा केला आहेत. तर या शपथविधीसाठी इतर पक्षाचे अनेक दिग्गज नेते आणि प्रमुख ही हजेरी लावणार आहे. यासाठी दिल्ली, मणीपूर, नागालॅंड आणि मेघालय राज्याचे प्रमुख आज मुंबईत येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. महायुतीच्या शपथविधी समारंभात तिन्ही पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर नेते ही हजेरी लावणार आहेत.
राजभवनावर कोण कोण आलंय?
शिवसेनेचे एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे तिन्ही प्रमुख नेते एकाच गाडीतून राज भवनावर पोहचले आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,आमदार प्रवीण दरेकर आमदार प्रसाद लाड आणि पंकजा मुंडे राज भवनावर पोहचले.
-गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन राजभवनावर पोहचलं आहे
भाजपचे रवींद्र चव्हाण, अशोक चव्हाण ही राजभवनावर दाखल.
भाजप नेते विनोद तावडे, आमदार श्रीकांत भारती आमदार निरंजन डावखरे ही राजभवनावर पोहचले आहेत
आमदार रत्नाकर गुट्टे आणि विनय कोरे राजभवनात पोहचले आहेत
आमदार कालिदास कोळंबकर हे ही राजभवनावर पोहचले
आमदार आशिष शेलार ही राजभवनावर दाखल
रावसाहेब दानवे राजभवनात दाखल
चंद्रकांत पाटील राजभवनात दाखल
सुधीर मुनगंटीवार राजभवनावर दाखल
शिंदेंचे संध्याकाळपर्यंत कळणार मी मात्र, शपथ घेणार – पवार..
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत अद्याप साशंकता आहे. या संबंधीत प्रश्न विचारण्यात आला असता शिंदे यांनी संध्याकाळी स्पष्ट होणार असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे अजित पवार यांनी शिंदेंचे संध्याकाळी कळेल मी मात्र, शपथ घेणार असल्याचे स्पष्ट केले. यावरुन चांगलाच हास्यकल्लोळ उडाला. तर यावरुनच दादांना संध्याकाळी आणि सकाळी शपथ घेण्याचा अनुभव असल्याची कोपरखळी शिंदे यांनी लगावली.
शिंदेंच्या मंत्रिमंडळात समावेशाबाबत अनिश्चितता..
एकनाथ शिंदे हे नव्या मंत्रिमंडळात असतील का? या बाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. फडणवीसांनी स्वत: त्याची माहिती दिली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी या बाबत स्पष्ट बालणे टाळले. या संबंधीतला निर्णय अद्याप झालेला नसून संध्याकाळी या विषयीची माहिती देणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
खेळीमेळीच्या वातावरणात सत्ता स्थापन – शिंदे..
मला काय मिळाले, यापेक्षा जनतेला काय देणार, यासाठी महायुतीने काम केले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून मला पाठिंबा दिला, त्याच ठिकाणी आम्ही फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. आज खेळीमेळीच्या वातावरणात सरकार स्थापन करण्याचा आनंद असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
मी दिल्लीला कोणाला भेटायला गेलो नव्हतो – अजित पवार
आपण दिल्लीला कोणालाही भेटायला गेलो नव्हतो, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. मी दिल्लीला वेगळ्या कामासाठी गेलो असल्याचे पवार यांनी सांगितले. आमच्याकडे असलेल्या अनुभवाचा फायदा जनतेला करुन देण्यासाठी आता महायुती प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. जी आश्वासने निवडणुकीच्या काळात दिली आहेत, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
मंत्रिमंडळात राहण्यासाठी शिंदेंना विनंती – फडणवीस
शिवसेनेचे अध्यक्ष आणि नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात राहावे, यासाठी आपण त्यांना विनंती केली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आणि ते आमची विनंती मान्य करतील, असा आम्हाला विश्वास असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे. आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी महायुती म्हणून कायम एकत्र काम करणार असल्याचा विश्वास या वेळी फडणवीस यांनी व्यक्त केला.
अपक्षांसह इतर मित्रपक्षांचे नाव
या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील इतर सर्व घटक पक्ष आणि अपक्षांचा उल्लेख करत सर्वांचेच आभार मानले. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसेच अजित पवार यांनी मला मुख्यमंत्री म्हणून शपथ देण्याची विनंती राज्यपालांकडे केली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा आझाद मैदानात होणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. तसेच किती मंत्र्यांना शपथ दिली जाईल, याची माहिती संध्याकाळी देणार असल्याचे देखील फडणवीस यांनी सांगितले.
महायुतीच्या वतीने दावा दाखल केला – फडणवीस.
महायुतीच्या वतीने आम्ही राज्यपालाकंडे सादर केला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाच तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता राज्यपाल महोदयांनी शपथविधीची वेळ दिली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.