कशेडी घाटात टँकरची ए.स.टी बसला धडक ;अपघातात आठ प्रवासी जखमी

Spread the love

खेड; मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हद्दीमधील कशेडी घाटात टँकरची एसटी बसला धडक बसून झालेल्या अपघातात आठ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप खेडचे प्रसाद गांधी यांनी रुग्णवाहिकेने जखमींना रुग्णायलात दाखल केले. खरंतर, गेले काही दिवस या महामार्गावर कशेडी परिसरात अपघातांचं सत्र सुरू आहे. त्यामुळे वाहन चालकांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ८ जखमी प्रवाशांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी सकाळी ११.५० सुमारास हा मोठा अपघात झाला आहे. कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्रापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर कशेडी घाटात ठाणे ते चिपळूण जाणारी एसटी बसक्र. MH-14-BT-2635 वरील चालक योगेश दादाजी देवरे वय ३५ वर्षे हे कशेडी घाट उतरत असताना समोरुन वाकवली तालुका दापोली ते मुंबई जाणारा टँकर क्रमांक UP-70-HT-7551 वरील चालक दिनानाथ हिरालाल यादव वय ५५ वर्षे राहणार घाटकोपर, मुंबई यांना डुलकी लागल्याने गाडी चुकीच्या साईडला जाऊन समोरून येणाऱ्या एसटी बसला धडकली. या अपघातामध्ये सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर आणि पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत करत अपघात ग्रस्तांना मदत केली.

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page