
इंदूर : देशात प्रचंड महागलेले शिक्षण आणि खर्चिक आरोग्य सुविधा याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी चिंता व्यक्त केली आहे. चांगल्या आरोग्य सुविधा स्वस्तात आणि सहज मिळायला हव्यात, असे म्हणत सरसंघचालक भागवत यांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी इंदूरमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये हे भाष्य केले. “सगळ्यांना सर्वात जास्त गरज असते ती, आरोग्य आणि शिक्षणाची. पण, दुर्दैवाने परिस्थिती अशी आहे की, या दोन्हीही गोष्टी आज सर्वसामान्य माणसापासून दूर आहेत आणि आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत”, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

“समाजाला आज अशा आरोग्य सुविधा हव्यात आहेत ज्या सहजपणे आणि स्वस्तात मिळतील. त्यासाठी अधिक जागा हव्या. बाजारीकरणामुळे केंद्रीकरणही होत आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“चांगले उपचार हवे असतील, तर लोकांना शहरांमध्ये जावं लागतं. कर्करोगावर उपचार होतात, असे भारतात आठ-दहाच शहरे आहेत. तिथे लोकांना जावं लागतं. तिथे उपचारांचा खर्च वेगळा असतो. तिथे येण्या-जाण्याचे खर्च वेगळा असतो. तिथ राहायचा खर्च असतो. कुटुंब चिंतेत असते की, पुढे काय होईल. एकाच वेळी या सगळ्या गोष्टी होत असतात”, असे सरसंघचालक भागवत म्हणाले.
“आपण बघतो की, माणूस आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी घरही विकतो, पण तो चांगले शिक्षण देतो. चांगल्या ठिकाणी उपचार घेता यावेत म्हणूनही घर विकतो आणि त्याची व्यवस्था करतो”, असेही ते म्हणाले.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
