
ईडीने कोकणातील एका बड्या उद्योजकाच्या घरी धाड टाकली आहे. तसेच, त्याच्या कंपनीवरही छापा टाकण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे…
रत्नागिरी: ईडीच्या धाडसत्राने यापूर्वीही अनेकांच्या झोपा उडवल्या आहेत. आता ईडीचे लक्ष पुन्हा एकदा कोकणवर आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एका मोठ्या उद्योजकावर ईडीने छापेमारी केली आहे. चिपळूण सावर्डे आणि खेड भरणेनाका परिसरातील या उद्योजकाच्या कंपनीवर ईडीचा छापा पडला आहे.
ईडीच्या चौकशीने अनेकांच्या झोपा उडाल्या…
चौकशी सुरू करण्यात आल्याने ऐन कडाक्याच्या थंडीत काहींच्या झोपा उडाल्या आहेत. हा उद्योजक रत्नागिरी जिल्ह्यातील एका बड्या नेत्याच्या जवळचा असल्याच बोलले जात आहे. हा उद्योजक कातव्यवसायाशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील एक बडा उद्योजकाच्या कारखान्यातही ईडीचे पथक दाखल झाले आहे. दोन्ही ठिकाणी बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पहाटेपासून ईडीची धाड पडली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात मोठी गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र, ईडीच्या या अचानक छापेमारी करून चौकशी करण्यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही. एकाच वेळी खेड भरणे नाका येथील कंपनीवर आणि सावर्डे परिसरातील कंपनीवर ईडीने चौकशी सुरू केल्याने परिसरात चर्चांना उधाण आलं आहे.

या धाड सत्राने राजकीय क्षेत्रातही काहीशी खळबळ उडाली आहे. ईडीचे अधिकारी मोठ्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. अधिकाऱ्यांनी कारखान्यातील कागदपत्रे, व्यवहार आणि आर्थिक नोंदींची तपासणी सुरू केली असून संपूर्ण परिसरात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे, असे म्हटले जात आहे.
धाड पडलेले व्यावसायिक रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत उद्योजक म्हणून ओळखले जातात. या उद्योजकाचा राजकीय वावर सुद्धा मोठा आहे. त्यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. यापूर्वी ईडीचे पथक हे कोकणात मुरुड येथील एका रिसॉर्टशी संबंधित वाद सुरू असताना दाखल झाले होते. त्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या अनेक फेऱ्या कोकणात झाल्या होत्या आता पुन्हा एकदा कोकण ईडीच्या रडारवर आल आहे. त्यामुळे कोकणातील उद्योजकांची झोप उडाली आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*