मुंबई :- देशातील अनेक पत्रकारांच्या घरांवर छापेमारी झाली आहे. शिवाय आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या घरावर देखील ईडीने छापेमारी केली आहे. यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, ८ ते ९ पत्रकारांवर कारवाई केली. चीनकडून फंडिंग मिळते, अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. हे आरोप हास्यास्पद आहेत . सरकारला प्रश्न विचारण्याचे काम हे पत्रकार बेडरपणे करतात. चीन हस्तक्षेप करत आहे, त्याबाबत सरकारला राग येत नाही. मात्र पत्रकारांवर धाडी घालत आहे, ते चुकीच आहे.
दरम्यान आणीबाणीचे तुम्ही प्रत्येक वर्षी श्राद्ध घालता. आणीबाणीच्या काळात देखील असं झालं नव्हतं. ईडीच्या धाडी संजय सिंह यांच्यावर देखील घातल्या गेल्या. आम्ही देखील त्यांच्यातून होरपळून बाहेर पडलो आहे. यंत्रणाच फास आवळत आहे.- अटक करताना कुठलेही कारण दिले जात नाही. ईडीचे लोक अंडरवर्ल्ड डॉन सारखे येतात, घुसतात आणि अटक करतात. मात्र २०२४ ला सर्वांचा हिशोब होईल असा इशाराही राऊत यांनी दिला.रश्मी शुक्लाबाबत राऊत म्हणाले , देशभरात आरएसएस संघ परिवार सर्वोच्च न्यायालयापासून पोलीस-आर्मीपर्यंत कोणत्या पदावर कोणाला बसवेल सांगता येत नाही.