
जनशक्तीचा दबाव न्यूज | प्राधिकरण | सप्टेंबर १४, २०२३.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला व निसर्गमित्र विभागाच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेत एकूण १३५ मूर्तिकारांनी स्वतःच्या हाताने सुबक व सुंदर शाडूच्या मूर्ती बनवल्या. मूर्तिकार चेतन हिंगे, मृणालिनी पाटील आणि मनीषा नातू यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती साकारण्यात आल्या. मूर्तीसाठी शाडू माती व अन्य साहित्य मंडळाच्या वतीने पुरवण्यात आले.
भास्कर रिकामे यांनी पर्यावरणप्रक मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन केले. वैदेही पटवर्धन, दीपक पंडित, मनेश म्हस्के, विजय सातपुते, अश्विनी अनंतपुरे, नेहा साठे, हर्षदा पोरे, शीतल गोखले, संपदा पटवर्धन,सुखदा भौन्सुले, अनुजा वनपाळ, माधुरी मापारी, मानसी म्हस्के, शारदा रिकामे, शैलेश भिडे, नीता जाधव, स्नेहल पानसे, अनघा देशपांडे, वैशाली आमले, सुजित गोरे आदींनी परिश्रम घेतले.