आवळा खाल्ल्याने कमी होते बॅड कोलेस्टेरॉल? हे पदार्थ हाय कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आहेत उत्तम…..

Spread the love

आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी कोलेस्टेरॉल आवश्यक आहे. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते. गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्टेरॉल यांचा शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो. कोलेस्टेरॉल वाढणे हा आजकाल एक सामान्य आजार आहे, ज्यामुळे बहुतेक लोक त्रस्त आहेत. बॅड कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL शरीरातील रक्तवाहिन्यांवर चरबीप्रमाणे जमा होते. ज्यामुळे रक्ताभिसरणावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे हृदयविकाराच्या झटक्यासारखी गंभीर आणि जीवघेणी परिस्थिती उद्भवू शकते.

शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आहार म्हणजे आपण कोणता आहार घेतो. तज्ज्ञांच्या मते, आहारात बदल करून बॅड कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे काहीही खाण्यापूर्वी त्याचे शरीरावर होणारे परिणाम माहित असणे गरजेचे आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आवळा बॅड कोलेस्टेरॉल कमी करू शकतो का..?

आवळा बॅड कोलेस्टेरॉल कमी करू शकतो…?

*एनसीबीआयच्या अहवालानुसार, उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येमध्ये आवळा खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होते. आवळ्याचे सेवन शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल एलडीएल कमी करून गुड कोलेस्टेरॉल एचडीएलची पातळी वाढविण्यात मदत करते.

*आवळ्याच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण आणि रक्तदाब सुरळीत राहतो, ज्यामुळे शरीरातील अनेक हृदयविकारांचा धोका कमी होतो. तुम्ही आवळ्याचा रस पिऊ शकता किंवा कोणत्याही प्रकारे आवळा खाऊ शकता. आवळा पावडर पाण्यात घालून पिऊ शकता. आवळा रक्तातून चरबी काढून पातळ करण्याचे काम कारण्यासोबतच शरीराच्या एकूण आरोग्यासाठी उत्तम अन्न आहे. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलही कमी होते.

लसूण…

हेल्थ लाइननुसार, उच्च कोलेस्ट्रॉलमध्ये लसणाचे सेवन अपेक्षेपेक्षा जास्त फायदेशीर आहे. लसूण रक्ताभिसरण सुधारण्यासोबतच शरीरातील गुड कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्याचे काम करते.

लाल यीस्ट तांदूळ…

सामान्य पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत लाल यीस्ट तांदूळ म्हणजेच रेड ईस्ट राईस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करून गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यास मदत करते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page