गणेशोत्सव काळात संगमेश्वर पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद, नागरिकांकडून समाधान व्यक्त…

Spread the love

*संगमेश्वर दिनेश अंब्रे-* संगमेश्वर तालुक्यातील संगमेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत मागझन दुरक्षेत्र, डिंगणी दुरक्षेत्र,  तसेच आरवली पोलीस चौकी व कडवई वांद्री परिसरात पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण,  निरीक्षक शंकर नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त गणेशोत्सवात ठेवला.
       

यावेळी नागरिकात गणेश उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखून उत्सव साजरा करण्यात व शांतता राखण्यात पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
      

अहोरात्र पाऊस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे गणेश भक्त भाविक,  वाहतुकीची कोंडी यावर मात करीत शांतता प्रस्थापित करण्याचे श्रेय संगमेश्वर पोलिसांना जाते.


        

रात्रीची गस्त,  येणाऱ्या तक्रारी,  रोजच्या दिनक्रमचे कामकाज यातूनच पोलीस स्टेशन बाहेरील प्रांगणात  स्थापन केलेल्या गणरायाची सेवा व रोज होणारे विविध उपक्रम प्रामाणिकपणे  पार पडत आपली सेवा बजावली.
    

पोलीस पाटील अंगराज कोळवणकर सुभाष गुरव यांनीही बंदोबस्तामध्ये सेवा बजावली. नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य केले.

🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page