अंत्ययात्रेवेळी दोन गटात दगडफेक; धारावीत तणावपूर्ण वातावरण, परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त…

Spread the love

धारावीमध्ये अरविंद वैश्य (Arvind Vaishya) या तरूणाची रविवारी हत्या झाली होती. तर त्याच्या अंत्ययात्रेवेळी दोन गटात दगडफेक झाल्यानं परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे.

धारावीमध्ये अरविंद वैश्य (Arvind Vaishya) या तरुणाची रविवारी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास हत्या झाली होती. आज सायंकाळी त्याच्या अंत्ययात्रेदरम्यान दोन गटात दगडफेक झाली. यामुळं परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर धारावी पोलिसांच्या मदतीला दादर पोलिसांचे कुमक देखील दाखल झाले होते.

*तरुणाची निर्घृण हत्या :*

धारावी परिसरात रविवारी रात्री अरविंद वैश्य या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपींना सोमवारी दोन तासांच्या आत अटक करण्यात आल्याची माहिती, धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजा बिडकर यांनी दिलीय. नियाज अस्लम शेख उर्फ अल्लु वय २४ वर्षे आणि आरिफ मोहम्मद आसिफ शेख वय २३ वर्षे अशी अटक आरोपींची नावे आहेत.

*रस्ता क्रॉस करण्यावरून झाला होता वाद…*

तक्रारदार शैलेंद्रकुमार हजेरीलाल वैश्य (वय ३०) हा धारावीत राहणारा असून मृत व्यक्तीचा भाऊ आहे. सोमवारी रात्री ७.१५ वाजताच्या सुमारास राकेश कदम याने फोनवरून शैलेंद्रकुमारला माहिती दिली की, अरविंद वैश्यला अल्लु, आरिफ, शुभम आणि शेरअली हे मारहाण करत आहेत. माहिती मिळाल्यानं शैलेंद्रकुमार हे राजीव गांधीनगर येथे पोहचून अरविंदला फोन करून माहिती विचारली. अरविंदने फोनवरती माहिती दिली की, सिध्देश गोरे आणि नियाज शेख याचे वडिल अस्लम शेख यांचा रस्ता क्रॉस करण्यावरून वाद होऊन मारामारी झाली होती.

*कशी घडली घटना?…*

हे भांडण सोडवण्यसाठी अरविंद आणि सिध्देश गोरे गेले असता त्यांच्यासोबत वाद झाला. त्यानंतर अल्लु आरिफ, शुभम, शेरअली यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी सिध्देश आणि अरविंद हे धारावी पोलीस ठाण्यात पोहचले. ते पोलीसांना घेवून राजीव गांधीनगर येथे येत असल्याचं आरोपीना सांगितलं. तक्रारदार शैलेंद्रकुमार हे राजीव गांधीनगर येथे पोहचले असता १०.१५ वाजताच्या सुमारास अरविंद वैश्य आणि राजेश पापान्ना हे मोटरसायकलवरून घटनास्थळी आले. त्यांच्यापाठोपाठ पोलीस गाडी देखील आली. अरविंद मोटरसायकलवरून उतरून आत गल्लीमध्ये घटनास्थळी पुढे पायी चालत जात असताना आरोपी नियाज अस्लम शेख आणि आरिफ मोहम्मद आसिफ शेखने अरविंदला मारहाण केली. तर नियाज शेखने त्याच्याकडील चाकू अरविंदच्या छातीत भोकसून गंभीर जखमी केलं. ते पळून जात असताना तत्काळ घटनास्थळी हजर पोलिसांनी आरोपी नियाज अस्लम शेखला ताब्यात घेतलं. तर दुसरा आरोपी त्याठिकाणाहून पळून गेला.

*धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल :*

पोलीसांच्या मदतीनं मयत अरविंद वैश्यला उपचारासाठी सायन रुग्णालय येथे दाखल केलं असता त्यास डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केलं. याबाबत धारावी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (२), ३५१ (२), ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पळून गेलेला आरोपी आरिफ याचा शोध चालू होता. त्याचवेळी गुप्त खबरीमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे, फरार आरोपी हा पळून जाण्याच्या तयारीत असताना पिवळा बंगला, राजीव गांधी नगर धारावी येथून त्याला गुन्हे प्रकटीकरण पथकाचे मदतीनं शिताफीनं ताब्यात घेतलं आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page