छत्रपती शिवाजी टर्मिनसहून रात्री सुटणाऱ्या हावड मेलमध्ये तीन फेरीवाल्यांनी संगनमत, दमदाटी करुन करुन झारखंडमधील एका प्रवाशाला लुटले. या प्रवाशाची गावी जाण्यासाठी जमवलेली अडीच हजार रुपयांची पैशाची पुंजी घेऊन फेरीवाले चोरटे फरार झाले.कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लुटीमुळे लोकल, एक्सप्रेसमधील फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे. लोकल, मेल एक्सप्रेसमधील काही फेरीवाले हे चोरीचे प्रकार करतात, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत. उपनगरीय महिला प्रवासी रेल्वे महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी लोकल, मेल, एक्सप्रेसमधील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी वेळोवेळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. तरीही रेल्वे अधिकारी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करुन रेल्वे प्रवासातील फेरीवाल्यांचा बंदोबस्त करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सोमवारी रात्री सुटणाऱ्या हावड मेलमध्ये तीन फेरीवाल्यांनी संगनमत, दमदाटी करुन करुन झारखंडमधील एका प्रवाशाला लुटले. या प्रवाशाची गावी जाण्यासाठी जमवलेली अडीच हजार रुपयांची पैशाची पुंजी घेऊन फेरीवाले चोरटे फरार झाले.कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लुटीमुळे लोकल, एक्सप्रेसमधील फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे. लोकल, मेल एक्सप्रेसमधील काही फेरीवाले हे चोरीचे प्रकार करतात, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत. उपनगरीय महिला प्रवासी रेल्वे महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी लोकल, मेल, एक्सप्रेसमधील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी वेळोवेळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. तरीही रेल्वे अधिकारी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करुन रेल्वे प्रवासातील फेरीवाल्यांचा बंदोबस्त करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलिसांनी सांगितले, झारखंड राज्यातील गिरिडोह जिल्हयातील बजटो गावातील रहिवासी अजय सिंह सुतार म्हणून काम करण्यासाठी नवी मुंबईतील खारघर येथे आला होता. काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारी रात्री तो हावड मेलने गावी जाण्यासाठी निघाला होता. सीएसएमटी रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक १७ वरुन रात्री सव्वा दहाची मेल सुटली. सामान्य डब्यातून अजय प्रवास करत होता. मेल सुटून पुन्हा रेल्वे स्थानका बाहेर थांबली. त्यावेळी एअरफोन विकणारे दोन फेरीवाले आणि त्यांचा एक साथीदार डब्यात चढले. अजय यांच्या शेजारील एका प्रवाशाने ५०० रुपयांची नोट देऊन दीडशे रुपयांना फोन खरेदी केला. फेरीवाल्याने परत कलेले उर्वरित ३०० रुपये खरेदीदाराच्या हातात होते. ५० रुपये नंतर देतो असे फेरीवाला म्हणाला. त्याचवेळी तेथे दुसरा एक इसम आला. त्याने खरेदीदाराला ‘तु कोणाचे पैसे चोरलेस. तुझ्या हातामधील पैसे कोणाचे आहेत,’ असा प्रश्न करुन त्याला चोर समजून दटावणी केली. अजयने दटावणी करणाऱ्याला त्याने एअरफोन खरेदी केला आहे. ५०० रुपयांमधून जी रक्कम परत मिळाली त्यामधील रक्कम त्याच्या हातात आहे असे सांगितले. त्यावेळी इसमाने अजयला ‘तु मध्ये बोलू नकोस. तुला आम्ही बघतो’ अशी धमकी दिली.
अजयने तात्काळ रेल्वेच्या मदत संपर्क क्रमांकावर संपर्क केला. तात्काळ रेल्वे सुरक्षा यंत्रणा जागी झाली. कल्याण रेल्वे स्थानकात सोमवारी रात्री सव्वा अकरा वाजता हावडा मेल येताच, रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी अजयला मेलमधून उतरविले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. त्याच्या तक्रारीवरुन तीन अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल करुन घेतला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
जाहिरात