विविध विकासकामांची भूमिपूजने आणि कॉर्नर सभांसह भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केला भरधाव दौरा. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

जनशक्तीचा दबाव न्यूज | संगमेश्वर | डिसेंबर ०७, २०२३.
संगमेश्वर (उत्तर) तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांच्या नियोजनानुसार रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव आणि सोबत असंख्य कार्यकर्त्यांनी संगमेश्वर तालुक्यात वेगवान प्रवास करत कडवई, धामणी, गोळवली, माखजन, सरंद, डिंगणी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन धुमधडाक्यात संपन्न केले. भाजपाच्या माध्यमातून जवळपास १० हून अधिक विकासकामे या भागांत आली असल्याने या दौऱ्यात जनतेचा सहभाग उल्लेखनीय होता.
यावेळी लोकसभा प्रमुख प्रमोद जठार, विधानसभा निवडणूक प्रमोद अधटराव व तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. शासन आपले असे तरीही स्थानिक खासदार पुरेसे सक्षम नसल्याने कोकणाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. यामुळे जनतेने संकल्पपूर्वक हे चित्र बदलले पाहिजे असा आग्रह श्री. प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. तर ‘शासन आपल्या दारी’ येण्यासाठी उत्सूक आहे मात्र त्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा ‘केंद्रात नरेंद्र आणि कोकणात नरेंद्रजींना समर्थन देणारा खासदार’ निवडून देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे असे प्रमोद अधटराव म्हणाले.
गावभेटी, संघटनात्मक बैठका, विविध क्षेत्रांतील तरुणांना प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव, विकासकामांची निवेदने इत्यादी कार्यक्रम या दौऱ्यात संपन्न झाले. श्री. प्रमोद जठार, श्री. प्रमोद अधटराव, श्री. अविनाश गुरव, श्री. विनोद म्हस्के, जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता जाधव, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. नुपूरा मुळ्ये, रूपेश कदम, अनिल घोसाळकर, डॉ. अमित ताठरे, सतीश पटेल, मिथुन निकम, संजय (बापू) सुर्वे, राजेश आंबेकर, महेश (बावा) जड्यार, शैलेंद्र धामणस्कर, सौ. शीतल दिंडे, स्वप्नील सुर्वे, प्रथमेश धामणस्कर, प्रशांत रानडे, मयुर निकम आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.