दुनियेचा पोशिंदा लघुचित्रपटाने मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा,झुंजार प्रोडक्शन एक पाउल पुढे

Spread the love

मुंबई (दिपक मांडवकर/शांताराम गुडेकर ) भारत हा कृषिप्रधान देश आता केवळ इतिहासा पुरता उरला आहे असे जणू सर्व शेतकरी कष्टकरी बळीराजाला वाटू लागले आहे.आणि याच माध्यमातून झुंजार प्रोडक्शन आम्ही कोकणकर प्रस्तुत लेखक/ दिग्दर्शक श्री.कृष्णा येद्रे, संकल्पना रमेश शिरगावकर, प्रोजेक्ट हेड आनंद सनगरे, अनुराग तुळसकर, सोशल मीडिया हेड सागर मालुसरे आणि डी. ओ.पी.प्रसाद दळवी प्रस्तुत दुनियेचा पोशिंदा यांच्या व्यथा मांडल्या आहेत.स्वातंत्र दीना निमित्ताने प्रदर्शित झालेला लघुचित्रपट दुनियेचा पोशिंदा कहाणी अधुऱ्या स्वातंत्र्याची हा लघुचित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी अगदी उचलुन धरलाआहे.

शेतकरी कष्ट करून त्याच्या पदरात काहीच उरत नाही. आणि उरलेल्या धान्याला मोल नाही. शासनाच्या विविध शेती विषयक सुविधांचा शेतकऱ्यांना पर्यंत लाभ मिळत नाही आणि शेवटी सावकाराच्या कर्जाची परतफेड न झाल्याने शेतकरी आत्महत्या करतो.याचे जिवंत उदाहरण या चित्रपटात पाहायला मिळाले तर कलाकार रमेश शिरगावकर याने उत्कृष्ट शेतकऱ्यांची बाजू मांडण्याची भूमिका पार पाडली आणि कलाकार सुनैना कोंडविलकर हिने शेतकऱ्यांच्या पत्नीच्या व्यथा उत्कृष्ट मांडल्या आणि चाहत्यांची शाबासकी मिळवली तर छोट्या मुलीच्या भूमिकेत वेदिका दिपक मांडवकर हिने माझ्या शेतकरी बापाच्या या जगाच्या पोशिंद्याच्या आत्महत्या कश्या थांबल्या पाहिजे, काय करायला हवं हे उत्तम मांडलेले आहे.डोळ्यात अश्रू अनावर होऊन प्रत्येक्ष रसिक प्रेक्षकांचा डोळ्यात अश्रू आणून सोडले. त्यासाठी रसिक वर्गाकडून कौतुकाचा वर्षाव झाला.या लघु चित्रपट मध्ये सर्वानी उत्कृष्ट अभिनय सादर केला आहे.दिग्दर्शक, निर्माते आणि संपूर्ण झुंजार प्रोडक्शनच्या टीमवर सर्व क्षेत्रातुन शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला असून एक उत्तम विषय घेऊन लोकांना चांगला लघु चित्रपट दिल्यामुळे अभिनंदनही केले आहे. झुंजार प्रोडक्शनचे एक पाहुल पुढे असल्याचे यानिमित्ताने सर्वानी मान्य केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page