मुंबई -गोवा महामार्गावर कानसई येथे उभ्या ट्रकला डंपरची जोरदार धडक; अपघातानंतर डंपर चालक पसार…

Spread the love

सुकेळी/ रायगड : मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका काही केल्यास थांबता थांबत नसल्याचे चित्र सध्यातरी नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिसून येत आहे. दरम्यान रविवारी (दि.१६) सुकेळी खिंडीतील खैरवाडी गावासमोरील वळणावरील सिमेंट टॅंकरला झालेला अपघात, नंतर मोटारसायकल झालेला अपघात समोर असतानाच
शुक्रवार दि. २१ रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील कानसई गावा जवळील हॉटेल बिजली समोर महामार्ग लगत उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या डंपर ने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मात्र नुकसान झाले आहे. तर या अपघातानंतर डंपर चालक मात्र तेथून पसार झाला आहे.


या अपघात संदर्भात नागोठणे पोलिस ठाण्यातून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कानसई येथील हॉटेल बिजली समोर मुंबईकडे जाणारा ट्रक (क्र.एमएच १२/केपी ८०२७) यातील चालकाने आपला ट्रक साईड पट्टीला सोडून उभा केला होता. यावेळी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास महाड बाजूकडून पनवेलकडे जाणाऱ्या डंपर (क्र. एमएच ४८/ एजी ९०१५) यातील अज्ञात चालकाचे आपल्या ताब्यातील डंपर वरील नियंत्रण सुटल्याने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने सदर अपघात घडला. यावेळी डंपरचा समोरील भाग चेपला गेला मात्र यावेळी या अपघातात डंपर चालकास कोणतीही दुखापत झाली नसून अपघातानंतर अज्ञात डंपर चालकाने मात्र पळ काढला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र डंपर व ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.


दरम्यान ट्रक चालकाच्या फिर्यादीवरून नागोठणे पोलिस ठाण्यात अज्ञात डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून नागोठणे पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पो.हवा. एस.एम.सावंत या पुढील तपास करीत आहेत

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page