
श्रीकृष्ण खातू /धामणी- संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पो.उ.नि. चंद्रकांत कांबळे यांची प्रशासकीय बदली मुंबई येथे झाल्याने त्यांचा शुभेच्छा समारंभ पोलीस स्टेशनमध्ये आयोजीत करण्यात आला होता.
नवनिर्वाचित हजर झालेले संगमेश्वर पो.निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या शुभहस्ते चंद्रकांत कांबळे यांना यथोचित सन्मानित करण्यात आले.व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

कांबळे यांनी संगमेश्वर पो.स्टेशन मध्ये सेवा बजावत असताना आपल्या वरिष्ठांशी विश्वासपूर्ण तसेच सहकारी पोलीस बंधू भगिनींच्या सहकार्याने अनेक कामे केली आहेत.त्याचप्रमाणें पोलीस सेवा खर्या अर्थाने लोकाभिमुख होण्यासाठी कार्य क्षेत्रात अनेक विश्वासू मित्र परिवार जोडला आहे. त्यामुळें अनेक तक्रारी संपुष्टात आणण्याचे महत्त्वाचे काम करून आपली ओळख येथे निर्माण केली होती.

या वेळी सामाजिक कार्यरकर्ते दिनेश अंब्रे, पो.हे.काॅ.सचिन कामेरकर,किशोर जोयशी,उप निरीक्षक शंकर नागरगोजे, पो.निरीक्षक राजाराम चव्हाण व शुभेच्छामूर्ती उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे यांनी मनोगत व्यक्त करून अनेक आठवणींना उजाळा दिला.
या शुभेच्छा समारंभासाठी पो.नि.राजाराम चव्हाण, पो.उ.नि.शंकर नागरगोजे, पो.उ.नि.प्रशांत शिंदे तसेच पोलीस स्टेशनचा स्टाफ, सामाजिक कार्यकर्ते दिनेश अंब्रे,
आकाश शेट्ये आदी मंडळीं उपस्थित होती.