पर्यटकांच्या गर्दीने फुलले गणपतीपुळे , देवस्थानतर्फे पार्किंग व्यवस्था नसल्याने भाविक; पर्यटकाना त्रास…

Spread the love

गणपतीपुळे/ जनशक्तीचा दबाव- श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे सध्या दिवाळीच्या सुट्टीच्या हंगामात पर्यटकांची संख्या कमालीची वाढल्यामुळे गणपतीपुळे हाउसफुल्ल झाले आहे.येथे येणाऱ्या भक्त व पर्यटकांच्या गाड्यांच्या अस्ताव्यस्त पार्किंग मुळे गणपतीपुळे संपूर्ण रस्त्यावरती वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे

गणपतीपुळे येथील आपटा ते मोरया चौक तसेच मोरया चौक ते कोल्हटकर तिटा तसेच आपटा ते बस स्टॅन्ड या परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे.

सध्या वाहतूक कोंडी सोडण्यासाठी गणपतीपुळे पोलीस तसेच त्यांचे सहकारी दिसत असून संपूर्ण दिवसभर वाहतूक कोंडी सोडवताना दिसत आहेत याबाबत स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत गणपतीपुळे संस्थान श्री देव गणपतीपुळे एम टी डी सी गणपतीपुळे तसेच पर्यटन व्यवसाय संघटना यांनी एकत्र येऊन याबाबत नियोजन केल्यास सदरचा प्रश्न वाहतूक कोंडीचा सुटू शकेल तसेच गणपतीपुळे गावातील हॉटेल्स व लॉजिंग व्यावसायिक यांची पार्किंग व्यवस्था नसल्याने त्यांच्या गाड्या सध्या रस्त्यावर लागत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत असून याबाबत गणपतीपुळे ग्रामपंचायत माजी उपसरपंच अजित केदार याबाबत संबंधित प्रशासनाला निवेदन देणार असल्याचे सांगितले.

संस्थान श्री देव गणपतीपुळे ही सेवाभावी संस्था असून येथे श्रीच्या दर्शनासाठी लाखो भाविक भेट देत असतात परंतु येथे येणाऱ्या भाविकांच्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था देवस्थान मार्फत करण्यात आलेली नसल्यामुळे तसेच वाहतूक कोंडी होती. देवस्थान या प्रकाराची दखल देत नसल्यामुळे या बाबतचे पत्र संस्थान श्री गणपतीपुळे तसेच जिल्हाधिकारी रत्नागिरी व संबंधित विभागांना देणार असल्याचे अजित केदार यांनी सांगितले

वाहतूक कोंडीसाठी येथील स्थानिक प्रशासन लॉजिंग व हॉटेल व्यवसायिक जबाबदार असल्याचे अजित यांचे म्हणणे आहे आहे त्यामुळे ग्रामस्थ व पर्यटकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page