
दीपक भोसले/संगमेश्वर- संगमेश्वर तालुक्यात पहिल्याच अवकाळी पावसामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले असून पाण्यामुळे वाहनांना मार्ग काढणे कठीण झाले आहे.
संगमेश्वर तालुक्यात चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून अवकाळी पावसामुळे या कामाला मोठा फटका बसला आहे . वांद्री पुलाच्या समोर रस्त्यावर माती आल्यामुळे वाहनांना धोका निर्माण झाला आहे. तर मानसकोंड या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे