
साखरपा- संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावचे सुपुत्र, हरहुन्नरी व्यक्तीमत्व व परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे कार्यालयीन अधिकारी दिपक बेर्डे हे रविवारी मोटारसायकलच्या अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांचे आज सोमवारी उपचारादरम्यान निधन झाले आहे.
दिपक बेर्डे हे रविवारी साखरपा येथून आपल्या नातलगाच्या विवाह सोहळ्यासाठी मोटारसायकलने लांजा तालुक्यात जात असताना भांबेड येथे अपघात होवून त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना त्वरित रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. देवडे पंचक्रोशीतील विकासासाठी ते सतत प्रयत्नशील असत. कामांचा पाठपुरावा करून ती कामे मार्गी लावण्यासाठी त्यांची धडपड असायची.
अनेक आमदारांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले होते. सध्या ते परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयात काम पहात होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच साखरपा व देवडे पंचक्रोशीत शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर