धडाकेबाज’मधला कवट्या महाकाल आठवतोय का?, पाहा मास्कमागचा चेहरा

Spread the love

महेश कोठारे (Mahesh Kothare) आणि लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांच्या एव्हरग्रीन चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘धडाकेबाज’. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांना एक जादूची बाटली मिळते. त्या बाटलीत गंगाराम कैद असतो. त्याच्याकडे असते ती जादूची रेती. ही रेती वापरून गंगाराम लक्ष्या आणि त्याच्या मित्रांची मदत करतो पण या चित्रपटातील एक गूढ अजूनही उलगडलेले नाही. ते म्हणजे या चित्रपटात कवट्या महाकालचे पात्र कोणी साकारले होते. ही भूमिका कोणी साकारली होती, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

अखेर एका मुलाखतीत चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांनी त्या चेहऱ्यामागच्या माणसाची खरी ओळख करून दिली. तो व्यक्ती महेश यांचा मित्र असल्याचे त्यांनी सांगितले. नुकतेच महेश यांच्या ‘डॅम इट’ या आमचरित्र नुकतेच प्रकाशित झाले. यावेळी त्यांनी कवट्या महाकाळबद्दल सांगितले. 

ते म्हणाले, ‘तो माझा एक जवळचा मित्र होता. आता तो हयात नाही. तो गुजराती अभिनेता होता. त्याचे नाव चंद्रकांत पंड्या. मी गुजराती चित्रपट खूप केले. त्यावेळी आमची ओळख झाली. दुर्दैवाने तेव्हा त्याच्याकडे काम नव्हते. तो एके दिवशी मला अचानक भेटला आणि म्हणाला चल चहा घेऊयात. बोलता बोलता म्हणाला की महेश काही काम असेल तर दे. मी त्याला म्हटले काम आहे पण संपूर्ण चित्रपटात मास्क घालावा लागेल. चेहरा दिसणार नाही. तो तयार झाला. अगदी एका पायावर तयार झाला. त्याने खूप उत्तम काम केले आणि ते पात्र खूप गाजले. सुरुवातीला मी आणि लक्ष्या त्याला कवट्या महाकालचा रोल करून दाखवायचो. नंतर तो त्याचे त्याचे करू लागला. हयात असताना त्याचे नाव मात्र कुणाला कळले नाही.’

चंद्रकांत पंड्या यांनी अनेक गुजराती चित्रपटात काम केले. त्यांनी सर्वाधिक गाजलेल्या ‘रामायण’ या मालिकेत निषाद राज राजाची भूमिका साकारली होती. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांचे निधन झाले. त्यावेळी ७२ वर्षाचे होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page