
ठाणे: ठाणे महानगरपालिका आयुक्त माननीय अभिजीत बांगर साहेब व दीक्षित मॅडम उपायुक्त समाज विकास विभाग यांना दिनांक12 /6/ 2013 निवेदन देऊन दिव्यांगांना मुलांच्या शिक्षणासाठी 2023 मार्चचे अनुदान दिव्यांग कायद्यानुसार लवकर जमा करावे याबाबत प्रत्येक्ष भेटून व चर्चा करुन निवेदन दिले त्यावेळेस मा. बांगर साहेबांनीआठवडाभरात जमा होईल असे आश्वासन दिले.परंतु आठ दहा दिवस होऊन सुद्धाअनुदान जमा झाले नाही….



म्हणून दिव्यांग हयुमन राईट फेडरेशन तर्फे महिला विभाग पदाधिकारी व तसेच सर्व दिव्यांग पदाधिकारी ,समाजसेवक,व सर्व ठाण्याचे दिव्यांग,तसेच राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक: प्राध्यापक भरत जाधव सर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिकांच्या याअन्याया विरुद्ध महानगरपालिकेवर सर्वपदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन मा. दीक्षित मॅडम वमा.बांगर साहेब यांना भेटून संबंधितअधिकाऱ्यांवर दिव्यांग कायद्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करावी व तसेच सर्व ठाण्याच्या दिव्यांगांना संस्थांना दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनला बेमुदत उपोषण करण्याची मागणी करण्यात आली.
नाही तर लवकर बँकेमध्येअनुदान जमा करावे असे सांगण्यात आले.याबाबत माननीय बांगर साहेब आयुक्त ठाणे महानगरपालिका यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिव्यांगांच्या बँकेमध्ये लवकरात लवकर अनुदान जमा करण्याचे आदेश दिले. या आठवडाभरात अनुदान बँकेत झाले नाही तर दिव्यांग हयुमन राईट फेडरेशन व संयोगी संस्था तसेच सर्व ठाणेतील दिव्यांगच्या वतीने ठाणे महानगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण संविधानाच्या मार्गाने करण्यात येईल .असे राष्ट्रीयअध्यक्ष: प्राध्यापक भरत जाधव सर यांनी चर्चा दरम्यान माननीय आयुक्त बांगर साहेब तसेच मा. दीक्षित मॅडम यांना ठणकावून सांगितले म्हणून दिव्यांगांचा कायदा असताना दिव्यांगांना त्यांच्या हक्कापासून व संरक्षणापासून प्रशासन व शासन न्याय देत नाही ही दिव्यांग समाजामध्ये एक अन्यायाची चीड निर्माण झालेली आहे ती भरून काढण्यासाठी सर्व दिव्यांग संघटना व दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन महाराष्ट्र राज्यात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तसेच माननीय राज्यपाल साहेब तसेच माननीय बच्चू कडू दिव्यांग मंत्रालय अध्यक्ष यांना त्यांना निवेदनव पञ देऊन बेमुदत उपोषण करेल असा ठराव पास करण्यात आला..
यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष मोरे ,ठाणे शहर संघटक चंद्रकांत पाटील ,ठाणे शहर महिला अध्यक्ष सुमन पवार, ठाणे शहर आयटी प्रमुख विरार दसाडे, ठाणे कार्यकारी सदस्य आयरे मॅडम, रिटा मॅडम, विजय अहिरे सचिव,संभाजी शिंदे ,दिवा शहराध्यक्ष रमेश पाटील ,शिंदे मॅडम ,चंद्रकांत हेगडे ,भोईर मॅडम दिवा शहर संघटक ,सर्व समाजसेवक, पदाधिकारी बहुसंख्येने ठाणे महानगरपालिकेवर आपल्या मागण्यासाठी जमले होते यांनी एकत्र येऊन दिव्यांग हयुमन राईट फेडरेशन च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजा्चा आदर्श घेऊन व वंदन करुन जनतेचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी या भारत देशात व महाराष्ट्रात दिव्यांग, वृद्ध ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग, अन्यागग्रस्त वंचित बहुजन वर्ग, सर्वांना बरोबर घेऊन या देशात राजकीय क्रांती, सामाजिक क्रांती, उद्योग क्रांती, आर्थिक क्रांती.. केल्याशिवाय आम्ही सर्व संविधानाला मानून व पालन करुन.. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून मानाचा मुजरा करुन शपथ घेऊन क्रांतीमध्ये सहभागी होत आहोत असा ठराव करण्यात आला…