
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघातर्फे १५ वर्षाखालील मुला-मुलींची वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप ४ ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत चीनमधील शांग्लूओ येथे आयोजित करण्यात आली आहे. भारताकडून अधिकृत शालेय व्हॉलीबॉल संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून, त्यासाठी भारतीय शालेय खेळ महासंघातर्फे राष्ट्रीय निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून पात्र खेळाडूंची निवड करण्यासाठी विभागीय स्तरावर निवड चाचणी होणार आहे.

कोल्हापूर विभागातील खेळाडूंसाठी ही विभागीय निवड चाचणी १२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता साताऱ्यातील छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे. इच्छुक खेळाडूंनी ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत निवड ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे. विभागीय निवडीत यशस्वी ठरणाऱ्या खेळाडूंना पुढे २५ ते ३० ऑगस्ट दरम्यान पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे होणाऱ्या राष्ट्रीय निवड चाचणीत सहभागी होता येणार आहे.
निवड चाचणीसाठी खेळाडूचा जन्म १ जानेवारी २०१० नंतर आणि १ जानेवारी २०१४ पूर्वी झालेला असावा. यापूर्वी किंवा नंतर जन्मलेले खेळाडू अपात्र ठरतील. निवड चाचणीस येताना शासकीय विभागाने वितरित केलेला इंग्रजीतील मूळ जन्मदाखला सादर करणे बंधनकारक असून, राष्ट्रीय स्तरावरील निवड चाचणीसाठी किमान सहा महिने वैधता असलेला भारतीय पासपोर्ट आवश्यक आहे. विभागीय चाचणीवेळी तात्काळ पासपोर्ट अर्ज केल्याचा पुरावा सादर करणेही आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी रवी पाटील (मो. ९१५८८२२१९४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
