दिवेकर नागरिकांचा डंम्पिंगवर विजय…भंडार्लीचा कचरा प्रकल्प सुरु झाल्याने दिवेकरांचा श्वास होणार मोकळा

Spread the love

दिवा (प्रतिनिधी)  डंपिंगच्या प्रदुषित  धुराच्या कोंडमाऱ्यामुळे  मेटाकुटीला आलेली जनता १ फेब्रुवारीपासून मोकळा श्वास घेणार आहे.ठाणे महानगरपालिकेकडून दिव्यात टाकण्यात येणारा आेला आणि सुका कचरा आता भंडार्ली कचरा प्रकल्पाकडे आजपासून वळविण्यात येणार आहे.यामुळे दिव्यातील नागरिकांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.

गेली कित्येक वर्षे दिवेकर नागरिक गुदमरले होते.दिव्यातील विकासाला, शहरातीच्या प्रगतीला सर्वात मोठा अडथला हा दिवा डंम्पिंग ग्राऊंडचा लोकांना होता.या डंम्पिंग प्रकल्पातून येणारा उग्र वास येथील लोकांच्या श्वसन प्रक्रियेवर मोठा आघात करीत होता.यामुळे येथील लोकांचे आरोग्य धोक्यात आले होते.वारंवार लागणाऱ्या आगीमुळे लोकांनी घरे विकून पलायन केले होते.यातून निघणारा धूर संपुर्ण दिवा शहरात पसरायचा.यामुळे लोकं वारंवार हैराण व्हायची.

हा प्रकल्प बंद करावा यासाठी येथील नागरिक,राजकीय संघटना, सामाजिक संघटना या वेळोवेळी प्रयत्न करीत होत्या.प्रसंगी दिवा डंम्पिंग ग्राऊंड बंद व्हावा यासाठी लोकांना अनेक न्यायालयीन चकराही माराव्या लागल्या.आंदोलनाच्या माध्यमातून काही पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटकही झाली होती.त्यामुळे या सर्व नागरिकांच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसुन येत.आहे.

माजी महापौर नरेश म्हस्के यांनी दिलेला शब्द पाळला

दिवा डंम्पिंग बंद होईल याची दिवेकर नागरिकांना स्वप्नातही वाटले नव्हते.परंतु नुकत्याच झालेल्या दिवा महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या दिवशी हजेरी लावलेले ठाण्याचे माजी महापौर श्री नरेश म्हस्के यांनी नागरीकांना भर कार्यक्रमात दिवा डंम्पिंग जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत होईल असे सांगितले होते.त्यामुळे आज जानेवारीच्या 31 तारखेलाच दिवा  डंम्पिंग बंद करण्यात आल्याने महापौरांनी दिलेला शब्द पाळल्याची प्रचिती आली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page