ठाणे :प्रतिनिधी (निलेश घाग) सनदशीर मार्गाने हजारो नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवून अनेक वेळा निवेदन देवून,मोर्चा काढून ही दिवा शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात रेल्वे प्रशासन अपयशी.दिवा शहरातील आणखी किती नागरिकांचे प्रवाशांचे जीव रेल्वे प्रशासन घेणार.
दिनांक 21/03/2023 रोजी झोपलेल्या रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी एल्गार मोर्चा काढला त्यावेळी रेल्वे प्रशासनाने पावसाच्या अगोदर प्लेट फॉर्म नंबर 1 चे काम पूर्ण करून दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल लोकल चालू करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते .दिवा पूर्व येथे तसेच प्लेट फॉर्मवर शौच्यालय बांधण्यात येथील त्यातील सद्या प्लेट फॉर्म नंबर 5 वर शौच्यालयाचे काम चालू आहे ते लवकर पूर्ण करू असे सांगण्यात आले.परंतु अद्यापही ते बंद अवस्थेत आहे. प्लेट फॉर्म नंबर 1,2,3,4,5 तसेच दिवा पूर्व पश्चिम रेल्वे फाटक बाजूला स्वयंचलित जिना बसवण्यात येईल असे सांगितले होते. तेही काम अर्धवट झाले आहे.आरक्षण खिडकी संदर्भात वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे.सर्व फास्ट लोकल दिवा येथे थांबवण्यात याव्यात. फास्ट लोकल अगोदरच भरून येत असल्याने काही फास्ट लोकल कल्याण येथून सोडण्यात याव्यात यावरही अद्याप तोडगा निघाला नाही.
दिवा शहरातील नागरिकांची महत्वाची मागणी होती ती म्हणजे दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल लोकल चालू व्हावी.परंतु अजूनही रेल्वे प्रशासन,या कडे गांभीर्याने घेत नाही.नागरिकांचे अपघात होवून जीव जात आहेत.नागरिकांचे जीव वाचवायचे असतील तर वरील समस्या गांभीर्याने सोडवल्या पाहिजे होत्या.परंतु कुठे तरी येणाऱ्या निवडणुकीत स्वतः ची वाहवा करण्यासाठी हे सर्व कामे जाणून बुजून करण्यात येत नाहीत असे दिसून येत आहे.राजकारण पेक्षा दिवा शहरातील नागरिकांचे जीव महत्वाचे आहेत.
श्रेय नको नागरिकांना सुविधा द्या त्यांचे जीव वाचले पाहिजेत.त्यामुळे या सर्व समस्या सोडवण्यासाठी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अमोल धनराज केंद्रे यांनी परत येकदा दिनांक 23/07/2023 रोजी रेल्वे राज्य मंत्री मा रावसाहेब दानवे साहेब ,मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब,कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेबांना निवेदन देवून तत्काळ समस्या सोडवून दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल लोकल चालू करून इतर समस्या सोडवून दिवा शहरातील लाखो नागरिकांना न्याय देण्याची विनंती केली आहे.
जाहिरात