मध्य रेल्वेवरील गाडी क्रमांक ५०१०३ दिवा – रत्नागिरी पॅसेंजरच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे प्रतिनिधी : मध्य रेल्वेवरील गाडी क्रमांक ५०१०३ दिवा – रत्नागिरी पॅसेंजरच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवा – रत्नागिरी पॅसेंजर नवीन वेळापत्रकानुसार बुधवारपासून धावेल.
गाडी क्रमांक ५०१०३ दिवा जंक्शन येथून दुपारी ३.२० वाजण्याऐवजी ५.५० वाजता सुटेल आणि रोहा येथे त्याच दिवशी ५.२५ ऐवजी रात्री ८.०७ वाजता पोहचेल. नवीन वेळापत्रकानुसार पनवेलला ही गाडी सायंकाळी ६.३० वाजता, आपटा येथे ६.५५ वाजता, जिते येथे ७.०७ वाजता, पेण येथे ७.१९ वाजता, कासू येथे ७.३० वाजता आणि नागोठणे ७.४३ वाजता पोहचेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
जाहिरात :