ठाणे :प्रतिनिधी (निलेश घाग) मध्य रेल्वे प्रशासन हे गणपती उत्सवाच्या काळात कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमानी भाविकांसाठी दरवर्षी गणपती स्पेशल ट्रेन सोडत असते. यावर्षी देखील रेल्वे प्रशासनातर्फे गणपती स्पेशल ट्रेन सोडण्यात आलेल्या आहेत. दिवा रेल्वे स्थानकातून यावर्षी देखील दिवा रत्नागिरी मेमु स्पेशल व दिवा- चिपळूण मेमु स्पेशल सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे. त्याबद्दल
दिवेकर कोकणवासिय व दिवा रेल्वे प्रवासी संघटना ही रेल्वे
प्रशासनाचे व या गाड्या दिवा स्थानकातून सोडण्यात याव्या
यासाठी प्रयत्न करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे
आभारी आहेत. मध्य रेल्वे प्रशासनातर्फे सोडण्यात येणाऱ्या
बहुतांशी गणपती स्पेशल ट्रेन हया ठाणे-दिवा-पनवेल मार्गे
कोकणात जात असतात. या बहुतांशी गाडयांना दिवा रेल्वे
स्थानकात थांबा नसल्या कारणाने दिवा, डोंबिवली, कल्याण
व त्यापुढील कोकणवासिय प्रवाशांना गाडी पकडण्यासाठी
व उतरण्यासाठी ठाणे स्थानकात जावे लागते.
ठाणे स्थानकातील प्रचंड गर्दी लक्षात घेता आपल्या परिवार व
सामानासह ठाणे स्थानकात चढणे उतरणे म्हणजे जोखीमचे
काम आहे. त्यामुळे वर उल्लेख केलेल्या मुंबई-
• सावंतवाडी गणपती स्पेशल (०११७१/०११७२),
• मुंबई-मडगाव गणपती स्पेशल (०११५१/०११५२) या
स्पेशल गाडयांना दिवा स्थानकात यांबा दिल्यास प्रवाशांची
मोठी सोय होणार असल्याचे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे
अध्यक्ष अँड. आदेश भगत यांनी मध्य रेल्वे विभागीय
व्यस्थापक यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
जाहिरात
जाहिरात