वयोवृध्द महिलांचा पाठलाग करून चैन चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास दिवा पोलीसांकडून अखेर अटक

Spread the love

दिवा ( सचिन ठिक )   मुंब्रा पोलीस ठाणे हददीतील दिवा शहर परिसरात वयोवृध्द महिलांना टार्गेट करून त्यांचा पाठलाग करून अथवा सदर महिला राहत्या इमारतीमध्ये जिन्याने घरी ये जा करीत असताना गळ्यातील चैन हिसकावून फरार होणाऱ्या चोरट्यास अटक करण्यास दिवा पोलिसांना यश आले असून त्याला खर्डी गाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे.हा गुन्हेगार सराईत असून दिवा परिसरातील गोरगरीब लोकांच्या पै पै कमाई करुन बनविलेले दागिणे हिसकावून पळवत होता.

यातील आरोपी कमलेश रामानंद गुप्ता (वय 33) हा जिन्यावरुन येणारे जाणारे अबाल वृद्ध यांच्या  गळ्यातील सोन्याचे दागिणे जबरीने खेचून पळून जात असल्याची घटना नुकतीच दिवा शहरात घडली होती.  वयस्कर महिलांना टार्गेट करून त्यांचे दागिने चोरी होत असल्यामुळे जनमानसांमधून गुन्हेगारास पकडून घडणा – या गुन्हयांना प्रतिबंध करणेची मागणी लोकांनी केली होती . त्यामुळे या गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठ पोलिसांनी तात्काळ सदरचे गुन्हे उघडकीस  आणण्याबाबत दिवा पोलिसांना आदेशित केलेले होते.

त्या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त परिमंडळ – १ ठाणे शहर, सहा. पोलीस आयुक्त, कळवा विभाग , ठाणे शहर यांनी घटनास्थळी भेट देवून, गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले होते. श्री  एन बी कोल्हटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंब्रा पोलीस ठाणे यांनी गुन्हयांच्या घटनास्थळी भेट देवून सदर गुन्हे उघडकीस आणण्याकरीता मुंब्रा व दिवा गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि शहाजी शेळके, बोरसे व अमंलदार यांची दोन पथके तयार करून गुन्हेगाराची गुन्हे करण्याची पध्दत, गुन्हे करण्यासाठी वापरलेले वाहन तसेच इतर तांत्रिक व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपी निष्पन्न करून त्यास अटक करणेबाबत वेळोवेळी मार्गदर्शन व पाठपुरावा केला. 

सदर पथकांनी दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ ते ११ मार्च २०२३ या कालावधीमध्ये घडलेले ४ चैन जबरी चोरीचे गंभीर गुन्हे उघडकिस आणण्यासाठी अविरत परिश्रम करून गुन्हयाची ठिकाणे, घटनास्थळ दिवा, खर्डीगाव, मुंब्रा व शिळफाटा परिसरातील सुमारे ११० खाजगी व महानगरपालिकेचे सी.सी.टी.व्ही . कॅमे – यांचे फुटेज संकलन केले. सदर सी.सी.टी.व्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण करून प्रथम आरोपी, त्याने गुन्हयात वापरलेली  मोटारसायकल व त्याचा जाण्या – येण्याचा मार्ग निष्पन्न केला . सदरचा आरोपी हा गुन्हे करून खर्डी गाव परीसरात जात असल्याचे आढळून आल्याने नमुद पथकांनी दोन दिवस आहोरात्र सापळा लावून आरोपीस दिनांक ११ मार्च २०२३ रोजी रात्रौ ० ९ .१५ सुमारास निर्मलनगरी खर्डी गाव येथून शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले. 

त्याचे नाव कमलेश रामानंद गुप्ता , वय ३३ वर्षे , व्यवसाय- ओला चालक, रा . पियुष मॅजिस्टीक, निर्मलनगरी खर्डी गाव ता.जि.ठाणे असे आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता मुंब्रा पोलीस ठाणे गुन्हा रजि . क . २४९ / २०२३ भा.दं.वि कलम ३९२ या गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास नमुद गुन्हयात दिनांक १२ मार्च २०२३ रोजी अटक करण्यात आली. पोलीस कोठडी दरम्यान तपासामध्ये त्याचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.

यापैकी  चैन जबरी चोरीचे ०४ गुन्हे व चोरीचे ०२ गुन्हे उघडकीस आलेले असून गुन्हयातील १, ९ १, १४८ रूपये किंमतींचा ६१ ग्रॅम सुवर्ण मुददेमाल व जबरी चोरीचे गुन्हे करण्याकरीता त्याने नौपाडा हददीतून चोरी केलेली ६०,०००/- रु . किंगतीची मोटार सायकल असा एकुण २,५१,१४८ रु किंमतीचा संपूर्ण मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. 

सदरची उल्लेखनीय कामगिरी श्री. गणेश गावडे, पोलीस उप आयुक्त , परिमंडळ – १, ठाणे शहर , मा . श्री . विलास शिंदे सोप , सहाय्यक पोलीस आयुक्त , कळवा विभाग यांच्या मार्गदशनाखाली मुंब्रा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन . बी कोल्हटकर , पोलीस निरीक्षक संजय पवार , बाबासाहेब निकम , सहायक पोलीस निरीक्षक शहाजी शेळके , कृपाली बोरसे , संतोष उगलमुगले , पोलीस उप निरीक्षक राजेंद्र किंगरे पोलीस अमंलदार सुभाष मोरे , जयेश तामोरे , योगेश पाटील , किशोर वैरागकर , निलेश लोंढे , प्रमोद शिंदे , उमाकांत गायकवाड , प्रमोद जमदाडे व अजीत येळे यांनी केली आहे . पुढील तपास सपोनि शेळके करत आहेत. 

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page