
दिवा : जर वीज ग्राहकांशी विनम्रपणे बोलण्याच्या सूचना टोरेंट च्या कर्मचाऱ्यांना दिल्या नाहीत तर त्यांना मनसे स्टाईल धडा शिकवण्याचा दिवा मनसेचा टोरेंट पॉवरच्या अधिकाऱ्यांना इशारा.
नोटीस किंवा आगाऊ सूचना न देता वीज कनेक्शन तोडणे, ग्राहकांशी उद्धटपणे बोलणे, वीज कनेक्शन कापण्यापूर्वी बिल भरले आहे की नाही याची शहानिशा न करणे , मीटर साठी मागणी करूनही वेळेवर मीटर उपलब्ध न करून देणे, मीटर न देता याउलट त्याच ग्राहकांवरचं विजचोरीची केस दाखल करणे, हिंदू सणांच्या काळात वीज पुरवठा बंद ठेवणे, अशा अनेक प्रश्नांवर आज दिवा मनसेने टोरेंट प्रशासनाची कानउघडणी केली.
यावेळी मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील, शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग अध्यक्ष देवेंद्र भगत, दिलीप गायकर, विभाग सचिव परेश पाटील,उपविभाग अध्यक्ष शैलेंद्र कदम, उपशाखाध्यक्ष सयाजी चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.