संगमेश्वर- संगमेश्वर ट्रामा केअर आणि संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात असणारे विविध तज्ञ डॉक्टरची कमतरता, अपुऱ्या साधन सुविधा आरोग्य सेवेसाठी या रुग्णालयात येणाऱ्या जनतेच्या समस्या अशा विविध समस्या सोडवण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक संघमित्रा फुले ग्रामीण रुग्णालायला भेट दिली.
शल्यचिकित्सक फुले यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग घेण्यात आली यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालयामधील असणाऱ्या सर्व समस्या मांडल्या
संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी पद , भुलतज्ञ्, अस्थिव्यग तज्ज्ञ नाही , गेल्या अनेक वर्षपासून सोनोग्राफी मशीन नसल्याने लोकांना सोनोग्राफी साठी खाजगी रुग्णालयात पाठविले जाते आणि त्या ठिकाणी ७००ते 800रु. देऊन सोनोग्राफी करावी लागते.
रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांना राहण्यासाठी व्यवस्थित निवासस्थाने नाहीत तसेच इमारत गळती असल्याने पावसात डॉक्टरांना इमारतीकडे उभे राहून शवविच्छेदन करावे लागते अशा अनेक समस्या सामाजिक कार्यकर्त्यांनी शल्यचिकित्सक संघमित्रा फुले यांच्याकडे मांडल्या.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक संघमित्रा फुले यांनी यावेळी सर्व समस्या सोडविणार असल्याचे सांगितले.